अट्टल घरफोड्याला बारामती पोलीसांकडून अटक
बारामती शहर पोलीसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अट्टल घरफोड्याला अटक केली.
लोकेश रावसाहेब सुतार वय - २८ रा.लिंगनूर ता.मिरज जि.सांगली असे आरोपीचे नाव असून बंद घरे हेरून तो भरदिवसा घरफोड्या करत होता.
पोलीसांनी ताबा वॉरंटच्या आधारे त्याला ताब्यात घेवून अटक केली.
संदीप यशवंत पाटील रा.लिंगनूर या साथीदाराच्या मदतीने तो घरफोड्या करत होता. त्याच्याकडून पोलीसांनी ७ लाख २० हजार रूपये किंमतीचे सुमारे १८ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले .
पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, उपनिरीक्षक सागर ढाकणे,अंमलदार अभिजित कांबळे या तपास पथकाने ही कारवाई केली.