ऍड.शेखर वाकोडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाकडून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल....
राजू टपाल.
टिटवाळा:- कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाकडून ऍड.शेखर वाकोडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वाकोडे यांनी पक्षाच्या चिन्हावर (तुतारी वाजवणारा माणूस )अर्ज सादर करत निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ऍड.शेखर वाकोडे हे स्थानिक राजकारणातील परिचित नाव असून, त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या वतीने प्रभाग क्रमांक 3 (ड) मधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज दाखल करताना पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उपस्थित होती. वाकोडे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे. शरद पवार साहेबांचा आदर्श घेऊन आणि कल्याण डोंबिवली जिल्हा परिसरातील आमचे वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जनतेच्या सेवेत कार्य करू. "केडीएमसी निवडणुकीत एकूण १२२ जागांसाठी रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांसह मनसे-उबाठा युतीनेही जोरदार तयारी केली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने कल्याण-डोंबिवलीत स्वतंत्रपणे किंवा स्थानिक समीकरणांनुसार उमेदवार उभे केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली असून,आता अर्ज छाननी आणि माघारीनंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून,निकाल १६ जानेवारीला लागेल. या निवडणुकीत ऍड. शेखर वाकोडे हे भिवंडी लोकसभा खासदार सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा) यांच्या खास मर्जीतले असल्याचे बोलले जाते, या अनुषंगाने तसेच एक उच्च शिक्षित तरुण चेहरा ऍड.वाकोडे यांच्या रूपाने तथा उमेदवारीमुळे राष्ट्रवादी (शरद पवार) गटाला बळ मिळेल,अशी अपेक्षा पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.