• Total Visitor ( 676896 )
News photo

कोंढापुरी येथे शनिवार पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन 

Raju Tapal publisher August 26, 2026 17

कोंढापुरी येथे शनिवार पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन 



विजय ढमढेरे



शिरूर:- शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी संचालक,ह.भ.प.रामदासनाना सर्जेराव गायकवाड यांनी ही माहिती दिली. अभिषेक,कलशपुजन,वीणापुजन,ज्ञानेश्वरी पुजन करून पारायणास  सुरूवात होणार असून शनिवार दिनांक २९ आॅगस्ट २०२६ पासून श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदीर आवारात  सुरूवात होणा-या अखंड हरिनाम सप्ताहाची सकाळी ७ ते ११ गाथा पारायण, दुपारी १ ते ४ गाथाभजन, संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा हरिपाठ, संध्याकाळी ७ ते रात्री ९ हरि किर्तन, रात्री साडेनऊ वाजल्यानंतर महाप्रसाद,रात्री १० नंतर हरिजागर, पहाटे ४ वाजता काकडा अशी हरिनाम सप्ताहाची रूपरेषा आहे. व्यासपीठ चालक ह.भ.प.सोपानराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणा-या हरिनाम सप्ताह सोहळ्यात ह.भ.प.कुमारी भक्ती ताई संभाजीराव जाधव,ह.भ.प.पवनमहाराज शास्त्री,ह.भ.प.संभाजी महाराज पवार,ह.भ.प.सोनाली दीदी करपे,ह.भ.प.बाळूमहाराज गिरगावकर,ह.भ.प.सुखदेव महाराज गाडेकर,पुरूषोत्तम पाटील महाराज गाडेकर या किर्तनकारांचे हरि किर्तन सप्ताह काळात पार पडणार असल्याचे सोसायटीचे माजी संचालक,ह.भ.प. रामदानाना गायकवाड यांनी सांगितले. कोंढापुरी येथील ग्रामस्थ चंद्रकांत बापूराव गायकवाड,शामराव गेणूजी घाडगे,तान्हाजी किसनराव गायकवाड,अंबर राधूजी गायकवाड,संपतराव आबासाहेब गायकवाड,श्रीकांत विठ्ठलराव गायकवाड,अंकूश रामदास लवांडे,अशोक मारूती दरवडे,  मुरलीधर शंकर दरवडे, शिवराम म्हस्के,किरण एरंडे, नामदेव सरडे बाळासाहेब अंकूशराव गायकवाड,सुखदेव आनंदराव गोगावले, संपतराव दत्तोबा गायकवाड,सागर शहाजी भोसले,अर्जून आनंदराव गोगावले या ग्रामस्थांनी सप्ताह काळातील जेवणाच्या पंगतीची सोय केली आहे. कोंढापुरी,कवठीमळा,खंडाळे,रासकरमळा,पिंपळे जगताप,महादेववाडी केंदूर,वाघाळे येथील भजनी मंडळांचा हरिजागर सप्ताहकाळात पार पडणार असून शुक्रवार दि‌.४ सप्टेंबर २०२६ रोजी ग्रामप्रदक्षिणा दिंडी सोहळा सायंकाळी ७ वाजता ज्ञानेश्वरी पारायण सांगता समारंभाचे आयोजन करण्यात आले असून शनिवार दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते ११ यावेळेत गणेश महाराज वाघमारे यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर महाप्रसादाने अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचा समारोप ग्रामस्थांच्या उपस्थितीत होणार असल्याचे सोसायटीचे माजी संचालक,ह.भ.प.रामदासनाना गायकवाड यांनी सांगितले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement