• Total Visitor ( 431229 )
News photo

22 नव्या जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा

Raju tapal June 02, 2025 110

22 नव्या जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा;



दोन ठिकाणी महिलांच्या हाती धुरा



भाजपाने दक्षिण मुंबईच्या जिल्हाध्यपदासाठी शलाका साळवी आणि वसई-विरार जिल्हाध्यक्षपदासाठी प्रज्ञा पाटील यांची केली निवड



मुंबई :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपाने सुद्धा लोकसभा निवडणुका पार पडल्यापासनूच संघटनात्मक निवडणुकीवर भर दिला आहे.यासाठी भाजापाकडून बूथ कमिटी, मंडलअध्यक्ष, शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष अशा निवडी आतापर्यंत पार पडल्या आहेत. यानंतर आता भाजपाच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची जून महिन्यातच घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी भाजपाने राज्यातील रिक्त राहिलेल्या जिल्हाध्यक्षपदांवर अखेर 31 मे ला घोषणा केली आहे.



पक्ष संघटनात्मक पातळीवर अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने भाजपाने आज 22 नव्या नेत्यांकडे जिल्हास्तरावरील महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. यात शहरी आणि ग्रामीण भागांचा समावेश असून भाजपाने दोन ठिकाणी महिलांच्या हाती धुरा सोपवली आहे. भाजपाने दक्षिण मुंबईच्या जिल्हाध्यपदासाठी शलाका साळवी आणि वसई-विरार जिल्हाध्यक्षपदासाठी प्रज्ञा पाटील यांच्यावर विश्वास दाखवला आहे.



उत्तर महाराष्ट्र

अहिल्यानगर शहर - अनिल मोहिते

नाशिक शहर - सुनील केदार

नाशिक दक्षिण - सुनील बच्छाव

नाशिक उत्तर - यतीन कदम



पश्चिम महाराष्ट्र

पुणे दक्षिण - शेखर वडणे

कोल्हापूर शहर - विजय जाधव



विदर्भ

गडचिरोली - रमेश बारसागडे

चंद्रपूर शहर - सुभाष कासमगुट्टवार

चंद्रपूर ग्रामीण - हरिश शर्मा

वर्धा - संजय गाते



मराठवाडा

परभणी ग्रामीण (शहराध्यक्ष) - सुरेश भुबंरे

छत्रपती संभाजीनगर शहर - किशोर शितोळे

तालुर शहर - अजित पाटील कव्हेकर

लातूर ग्रामीण - बसवराज पाटील

नांदेड उत्तर - किशोर देशमुख

नांदेड दक्षिण - संतुकराव हंबर्डे

बीड - शंकर देशमुख



मुंबई

उत्तर पश्चिम मुंबई - ज्ञानमूर्ती शर्मा

दक्षिण मध्य मुंबई - निरंजन उभारे

दक्षिण मुंबई - शलाका साळवी

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement