राज्यात धर्मांतर विरोधी कायदा लागू होणार
मुंबई :- राज्यात अनेक ठिकाणी धर्मांतर करण्याच्या घटना घडत असल्याचा मुद्दा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत मांडला. यावर पंकज भोयर यांनी स्पष्टीकरण देत समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
पंकज भोयर म्हणाले, महाराष्ट्रात कुठेही जबरदस्तीने धर्मांतर करण्याची परवानगी नाही. परंतु, एक समिती स्थापन करून अभ्यास करण्यात आला, तेव्हा जवळजवळ ३५ केसेस घडल्या होत्या. मात्र, त्यांनी स्वत:हून धर्मांतर केल्याचे समोर आले. साधे सरळ जे लोक असतात त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न काही संस्था करत असतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून पुढील महिन्यात याचा अहवाल येणार आहे.तसेच शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी प्रश्न उपस्थित केला की देशातील १० राज्यांमध्ये धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यात आला आहे, आपल्या राज्यात लागू होणार का? यावर पंकज भोयर म्हणाले ११ वे राज्य हे महाराष्ट्र असणार आहे आणि अतिशय कडक कायदा केला जाणार आहे.