पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील गृहमंत्र्याच्या घरावर हल्ला;
आंदोलकांनी घर दिले पेटवून;
पाकिस्तानात गृह युद्ध भडकणार?
नवी दिल्ली :- सिंध प्रांताच्या मोरो शहरात सध्या अफरातफरी माजली आहे.पाकिस्तान सरकारच्या एका प्रकल्पाविरोधात सिंध प्रांत पेटून उठलाय.सिंध प्रांताचे गृहमंत्री जियाउल हसन लंजर यांचा बंगलाच आंदोलकांनी पेटवून दिलाय.आंदोलकांनी रस्त्यावर जाळपोळ करत अनेक गाड्याही पेटवून दिल्या. सिंध प्रांतात गृह युद्ध भडकण्यामागे कारण ठरलायं तो पाकिस्तान सरकारचा सिंधू नदीवरील प्रकल्प.
हे आंदोलक कालवा तयार करण्यास विरोध करत होते.या प्रदर्शनादरम्यान काही प्रदर्शनकर्त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आली.त्यानंतर तिथे उपस्थित असलेले आंदोलक संतप्त झाले. त्यांनी गृहमंत्र्यांच्या घराबाहेर जोरदार गोळीबार केला आणि नंतर घर पेटवून दिले.भारत-पाक संघर्षाला सुरुवात झाल्यानंतर भारतानं सिंधू जल कराराला स्थगिती दिली. त्यानंतर सिंधमधील शेतकऱ्यांना कराराच्या स्थगितीचा सर्वाधिक फटका बसला. अशात पाक सरकार सिंधमधील कृषी क्षेत्राच्या मुळावरच उठलयं.त्यामुळे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या सिध प्रांतातील नागरिकांमध्ये पाक सरकारबाबत असंतोष निर्माण होऊन गृहयुद्धाला सुरुवात झालीय. सिंधू नदीवरील सहा कालव्यांचा हा प्रकल्प पंजाब प्रांतासाठी वरदान ठरणार आहे तर सिंधमधील कृषी क्षेत्राला त्याचा मोठा फटका बसणार. आणि हाच कळीचा मुद्दा ठरणार आहे.ऑपरेशन सिंदूरनंतर बलुचिस्तानकडून वारंवार बंडाची घोषणा करण्यात येतेय. त्यात आता पाकचा सिंधू नदीवरील प्रकल्प गृहयुद्धाच्या आगीत तेल ओतणारा ठरणार आहे. पाकचं हे भेदभावाचं धोरणच सिंध, खैबर पख्तूनख्वा आणि बलूचिस्तानच्या अतंर्गत यादवीला कारणीभूत ठरणार आहे आणि परिणीती त्याच्य़ा फुटीत होणार हे निश्चित.