शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकपदी चंद्रशेखर यादव
शिक्रापूर ग्रामपंचायतीचे प्रशासक रमेशराव गडदे,भाजपचे पदाधिकारी राजाभाऊ मांढरे यांच्यावतीने पत्रकारांच्या उपस्थितीत सत्कार
शिरूर:- पुणे ग्रामीण पोलीस दलातील प्रशासकीय बदल्यांतर्गत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांची जिल्हा विशेष शाखा पुणे ग्रामीण येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी बारामती तालुका पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक चंद्रशेखर मोहनराव यादव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षकपदाचा पदभार स्विकारला आहे. शिक्रापूर ग्रामपंचायतीचे प्रशासक रमेशराव गडदे,भाजपचे पदाधिकारी राजाभाऊ मांढरे यांच्या वतीने शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने नियुक्ती झालेले पोलीस निरीक्षक चंद्रशेखर मोहनराव यादव यांचा शिक्रापूर परिसरातील पत्रकारांच्या उपस्थितीत सत्कार,सन्मान करण्यात आला. दरम्यान,पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठ्या प्रमाणात अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून ३० पोलीस निरीक्षक,सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची नव्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी जारी केलेल्या आदेशानुसार कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करणे,प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणणे,स्थानिक पातळीवरील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे असे समजते.