बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळाल्याने ग्रामीण भागातील जत्रा यात्रांना रंग भरणार
Raju Tapal
December 20, 2021
214
बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळाल्याने ग्रामीण भागातील जत्रा यात्रांना रंग भरणार ; जनता दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर
बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळाल्याने ग्रामीण भागातील जत्रा यात्रांना रंग भरणार असल्याची प्रतिक्रिया जनता दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री.संजय बारवकर यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे.
या निर्णयाचे पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते , विविध संघटनांचे पदाधिकारी, बैलगाडा मालक ,शेतकरी, बैलगाडा शौकिनांकडून ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे.कुठे फटाक्यांच्या आतषबाजीने , कुठे ढोलताशांच्या गजरात सर्जा राजाच्या पुनरागमनाचे, सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना दिलेल्या परवानगीचे स्वागत केले जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना दिलेल्या सशर्त परवानगीचे स्वागत करताना या निर्णयाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना जनता दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री.संजय बारवकर यांनी म्हटले आहे की, या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतक-यांना आनंद झाला. प्राणीमात्रांवर प्रेम करणारा आपला देश आहे. बैलगाडा शर्यतीं पुन्हा चालू होणार असल्याने ग्रामीण भागातील जत्रा यात्रांना रंग भरणार आहे.अशी प्रतिक्रिया जनता दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री.संजय बारवकर यांनी व्यक्त केली.
Share This