• Total Visitor ( 409674 )
News photo

धामारी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये भाकरी महोत्सव 

Raju tapal February 28, 2026 79

धामारी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये भाकरी महोत्सव 

     

शिक्रापूर:- शिरूर तालुक्यातील धामारी गावातील खंडेराय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता ५ वी ते ९ वी मधील विद्यार्थ्यांनी माझी शाळा माझी भाकरी उपक्रमांतर्गत भाकरी महोत्सव साजरा करून आनंद व्यक्त केला. श्रमाची प्रतिष्ठा वाढविणे,स्वावलंबनाची जाणीव,पारंपारिक अन्न संस्कृतीची ओळख, संघभावना व सहकार्य वृत्ती,आरोग्य व पोषण शिक्षण,स्वच्छता व शिस्त,शाळेमधील आत्मीयता या उद्देशाने भाकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भाकरी महोत्सवातून श्रमसंस्काराची गरज जाणवली,स्थानिक अन्न संस्कृती जपण्याची प्रेरणा,स्वावलंबन व जीवन कौशल्ये,शाळा व समाजाशी नाते दृढ करणे यावरून ही कल्पना सुचली असून हा उपक्रम म्हणजे शिक्षण+संस्कार+संस्कृती असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून या उपक्रमात खंडेराय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव,आजी-माजी संचालक,केंद्रप्रमुख,सुतार साहेब,स्वाती खेडकर,अंजना मॅडम,विक्रम मकवाना‌ सर,डाॅ.तुकाराम शिंदे, गौतम सागर सर,अर्चना शिंदे मॅडम,अंकुशराव घारे,मॅजिक बसचे साळवी सर,यांच्या सहीत  ४२० विद्यार्थी तसेच १८ कर्मचारी सहभागी झाले होते.

            


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement