• Total Visitor ( 407318 )
News photo

डोंबिवली पश्चिमेतील बेकायदा बांधकामांशी संबंधित नगरसेवकाना नोटीसा...

Raju tapal February 26, 2026 100

डोंबिवली पश्चिमेतील बेकायदा बांधकामांशी संबंधित नगरसेवकाना नोटीसा...



डोंबिवली परिसरात बेकायदेशीर बांधकामांशी संबंधित तीन नगरसेवकांना नोटीस बजावण्यात आली आहे. या तिन्ही नगरसेवकांनी बेकायदेशीर बांधकामांशी संबंध असल्याचे समोर आले असून त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला उमेदवारी अर्ज भरताना चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयातील वकील अॅड. अर्चना भसरे यांनी नोटीस पाठवली आहे. डोंबिवली परिसरातील सत्ताधारी पक्षातील हे लोकप्रतिनिधी असून त्यामध्ये एक ज्येष्ठ नगरसेवक आणि दोन नगरसेविका आहेत. या तिघांचा बेकायदेशीर बांधकामांशी थेट संबंध असल्याचे आरोप आहेत. तक्रारदार कल्पेश जोशी यांनी यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाला माहिती दिली आहे. या प्रकरणात आवश्यक चौकशी करून संबंधित नगरसेवकांवर कारवाई करण्यात यावी, तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून आवश्यक कागदपत्रांची माहिती मागवावी,अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 10 (1) अंतर्गत या नगरसेवकांना अपात्र (अयोग्य) ठरवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, असे नोटीसमध्ये नमूद आहे. ही नोटीस राज्य निवडणूक आयोग,नगरविकास विभागाचे प्रधान सचिव,कोकण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी,कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त आणि संबंधित नगरसेवकांना पाठवण्यात आली आहे. या नोटीसमुळे बेकायदेशीर बांधकामांशी संबंधित नगरसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे. डोंबिवली परिसरात एकूण आठ नगरसेवक बेकायदेशीर बांधकामांशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या सर्वांवर कारवाई करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement