बारामती परिसरात घरफोड्या करणा-या सराईताला नगर जिल्ह्यातील कर्जतमधून अटक
Raju Tapal
October 27, 2021
38
बारामती परिसरात घरफोड्या करणा-या सराईताला नगर जिल्ह्यातील कर्जतमधून अटक
बारामती परिसरात घरफोड्या,चो-या करणा-या सराईताला बारामती पोलीसांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमधून अटक केली.
निग-या उर्फ संजय देविदास भोसले वय -४२ रा.राजीव गांधी झोपडपट्टी ,कर्जत जि.अहमदनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून आरोपीकडून बारामती पोलीसांनी सोने चांदी रोख रकमेसह ५ लाखांचा ऐवज हस्तगत केला.
आरोपी निग-या उर्फ संजय भोसले हा अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी सापळा लावून कर्जत येथून आरोपीला ताब्यात घेवून चौकशी केली असता बारामती परिसरातील सुर्यनगरी, तांदूळवाडी, वंजारवाडी परिसरात दोन साथीदारांसमवेत ९ घरफोड्या केल्याची कबुली दिली.
उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार राहूल पांढरे, नंदू जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, बापुराव गावडे, अनिकेत शेळके यांनी ही कारवाई केली.
Share This