बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणा-या आरोपीला बारामती शहर पोलीसांकडून अटक
बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणा-या आरोपीला बारामती शहर पोलीसांनी अटक केली.
देवेंद्र उर्फ बनू हुकूमचंद यादव वय - २७ मूळ रा. हांडिया खेडा ता.खांडवा मध्यप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून एका गावठी पिस्तुलासह पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
तो मुळचा मध्यप्रदेशातील असून पिस्तूल विक्रीसाठी या भागात आला असावा असा पोलीसांचा संशय असून त्याच्याविरोधात पोलीसांनी शस्त्र अधिनियमानूसार गुन्हा दाखल केला.
बारामती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडिक, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक सागर ढाकणे, कल्याण खांडेकर, तुषार चव्हाण, गौरव ठोंबरे, शाहू राणे, अभिजित कांबळे आदींनी ही कारवाई केली.