भातकुली पंचायत समितीने धावपट्टी गाजविली!
१५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत गजानन भातकुलकर विजयी
सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट सादरीकरण
भातकुली, दि.८: जिल्हापरिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवात भातकुली पंचायत समितीच्या खेळाडूंनी वैयक्तिक व सांघिक खेळात धावपट्टी गाजवत मैदान मारले, तर सांस्कृतिक कार्यक्रमात कराओके, सिनेगीत, हास्यजत्रा, एकल नृत्य व समूहनृत्याने धमाल उडविली. गजानन भातकुलकर हे २०१५ पासून १५०० मिटर धावण्याच्या शर्यतीत जिल्हा व विभागीय स्तरावरील स्पर्धेत विजेता ठरले आहे.
जिल्हापरिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान उत्साहात झाला.
भातकुली पंचायत समितीने वैयक्तिक खेळात १५०० मीटर धावणे पुरुष स्पर्धेत गजानन भातकुलकर यांनी धावपट्टी गाजविली. ते गेल्या दहा वर्षांपासून ही स्पर्धा जिल्हा व विभागीय स्तरावर जिंकत आहे. त्यांनी वेगवान धावत यावर्षीदेखील प्रथम क्रमांक पटकावित विजयी मिळविला. त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
दिव्यांग विभागात भालाफेक या खेळात शुभांगी देशमुख ह्या द्वितीय क्रमांकाच्या विजयाच्या मानकरी ठरल्या.
बॅडमिंटन एकेरी ( पुरुष) खेळात स्वप्निल उपासे प्रथम क्रमांक पटकावित विजयी झाले. तर, बॅडमिंटन दुहेरी (पुरुष) खेळात सतिश वानखडे, स्वप्निल उपासे प्रथम क्रमांकाच्या विजयाचे मानकरी ठरले.
सांस्कृतिक कार्यक्रमात सिनेगीत प्रज्ञा जोशी यांनी सुमधुर आवाजात गायिले. तर कराओके नंदकिशोर किनाके यांनी गायिले. भावगीत विजय भाजपाले यांनी म्हटले. एकल नृत्यात कीर्ती तायडे यांनी लावणी वर नृत्य सादर केले. त्यांच्या नृत्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. समुह नृत्याचे प्रशांत न्याहाळकर व चमूने उत्कृष्ट सादरीकरण केले. तर हास्यजत्रा नाटिकेत लखन जाधव व त्यांच्या टीममधिल शेख रुस्तम, मोहम्मद शाफिक, मधुकर पवार, शेख अनिस, सतीश वानखडे, नावेद इकबाल, शैलेंद्र दहातोंडे यांनी धमाल उडवून दिली.
विजयी सर्व खेळाडूंचे गटविकास अधिकारी तुषार दांडगे, गटशिक्षणाधिकारी दीपक कोकतरे, शिक्षण विस्तार अधिकारी शेख अहमद खान, पंजाबराव पवार, केंद्रप्रमुख निता सोमवंशी, जानराव सुलताने, नरेंद्र धनस्कर, उमेश चुनकीकर, रविंद्र धरमठोक, प्रफुल वाठ, किशोर रुपणारायन, शैलेंद्र दहातोंडे,राजेश सावरकर,शिक्षक संघटनेचे पदाधिकारी,विषय तंज्ञ यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख व कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.
गजानन भातकुलकर विभागीय स्तरावरील विजेता !
भातकुली तालुक्यातील गणोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचर म्हणून कार्यरत असलेले गजानन भातकुलकर यांनी सन २०१५ पासून जिल्हा व विभागीय स्तरावर १५०० मीटर धावणे स्पर्धेत विजेता ठरले आहे. यावर्षीदेखील जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवात १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावून विजयी झाले. ही त्यांची जिल्हा परिषदेची शेवटची स्पर्धा होती. गुरुवारी ( ता.६) ते मोर्शी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वरिष्ठ लिपिक या पदावर रुजू झाले आहे. गजानन यांनी सुमारे २०१५ पासून विभागीय व जिल्हास्तरीय १५०० मीटर धावणे स्पर्धेत सातत्याने विजय मिळवला.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.