भातकुली तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवाला उत्साहात सुरुवात
सरपंच अन्नपूर्णाताई मानकर यांच्या हस्ते उदघाटन
जि.प.शाळेचे खेळाडू व शिक्षकांचा सहभाग
भातकुली:- भातकुली तालुकास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवाचे उदघाटन सरपंच अन्नपूर्णा मानकर यांच्या हस्ते झाले. शुक्रवारपासून सायत येथील संत गाडगेबाबा विद्यालयात या महोत्सवाला सुरुवात झाली.
प्रारंभी, मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचेपूजन,दीपप्रज्वलन,ध्वजारोहण,क्रीडाज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले. यावेळी केशरी,पांढरे,हिरव्या रंगाचे फुगे आकाशात उडवून कार्यक्रमाला दणक्यात सुरुवात झाली.
जि.प.पूर्व.माध्य मराठी शाळा धमोरीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्याने व नंतर पुष्पगुच्छ देवून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले, चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे निदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या खोलापूर मुले, आसरा, वायगाव, वाकी रायपूर, उर्दू शाळा खोलापूर कन्या, दाढी या शाळांनी सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी प्रविण वानखेडे होते,तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुनिल राणा,आशिषभाऊ कावरे,शाळा समितीचे अध्यक्ष मंगेशभाऊ मोहोड,मुख्याध्यापिका पुष्पाताई रामावत,पोलिस पाटील अशोकराव राऊत, सामाजिक कार्यकर्ते राजुभाऊ चुनकीकर, बाबूलाल तेलमोरे, गटशिक्षणाधिकारी दिपक कोकतरे, शापोआ अधिक्षक नरेंद्रजी गायकवाड,शिक्षण विस्तार अधिकारी शकील अहमद खाँ,पंजाबराव पवार,केंद्रप्रमुख जानरावजी सुलताने,निताताई सोमवंशी,नरेंद्र धनस्कर,उमेश चुनकीकर,रविंद्र धरमठोक,किशोर रुपणारायन व शैलेंद्र दहातोंडे सर्व संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पुष्पा रामावत,मिनाक्षी वाचासुंदर,विल्हेकर यांनी काम पाहिले.
यावेळी सुनील राणा,आशीष कावरे, प्रविन वानखेडे व दिपक कोकतरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्रजी गायकवाड यांनी केले.संचालन अभिषेक खांडे व दिपीका भारती यांनी केले तर आभार प्रदर्शन किशोर रुपणारायन यांनी केले. या क्रीडा महोत्सवात सांघिक व वैयक्तीक स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक/शिक्षिका,संत गाडगेबाबा विद्यालय सायत येथिल सर्व शिक्षक/शिक्षिका,गटसाधन केंद्रातील सर्व विषय तज्ञ,फिरते शिक्षक,संघटना प्रतिनिधी यांचे मोलाचे सहकार्य लागले असे प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.