• Total Visitor ( 133226 )

नागपूरात औरंगजेबच्या कबरीवरुन मोठा राडा

Raju tapal March 18, 2025 42

नागपूरात औरंगजेबच्या कबरीवरुन मोठा राडा
दोन गटात दगडफेक
दगडफेकीत पोलीस जखमी 

शांतता राखण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन 

नागपूर :-औरंगाजेबच्या कबरीवरून सोमवारी राज्यभर आंदोलन करण्यात आली. नागपूरमध्ये सोमवारी रात्री दोन गटामध्ये राडा झाला. दगडफेक करण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तैणात असणाऱ्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. यामध्ये २५ पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहे. नागपूर पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी सोमवारी रात्रीपासून नागपूरमध्ये जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांततेचे आवाहन केले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून औरंगाजेबच्या कबरीवरून जोरदार वाद सुरू आहे. सोमवारी नागपूरमध्ये याला उग्र रूप आले. नागपूरमध्ये दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. जमावाकडून दगडफेक करण्यात आली. जाळपोळ आणि दगडफेकीनंतर नागपूरमधील वातावरण चिघळले. पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. जिल्हाधिकारी आणि पोलिस कमिशनर यांनी तात्काळ शहरात जमावबंदी आणि मनाई आदेश लागू करण्यात आले. नागपूरमध्ये सोमवारी रात्री जोरदार राडा झाला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दोन गटात हाणामारी आणि दगफेक झाली. जमावाला पांगवण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर करण्यात आला.

पोलिसांकडून रात्रीभर आरोपींची शोधमोहिम सुरू करण्यात आली. राडा झाला, त्याठिकाणाहून पोलिसांनी अर्धा ट्रॉली दगड जमा केले आहेत. पोलिसांनी सोमवारी रात्री कोंबिंग ऑफरेशन राबवत ५० संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून मुख्य सुत्रधारांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना शांततेचं आवाहन केलेय. नागपूरमध्ये सध्या पोलिसांचाा तगडा बंदोबस्त आहे. नागपूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून मुख्य आरोपीचा शोध घेतला जात आहे.
 

Share This

titwala-news

Advertisement