• Total Visitor ( 653691 )
News photo

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी...

Raju Tapal publisher August 02, 2026 26

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी



विलास भोईर - प्रतिनिधी

मातांग समाजाचे दैवत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अखील भारतीय मातंग संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष काकासाहेब सुदाम गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,वाडेकर येथील शशांक शाळेत,पारनाका येथील अभिनव शाळेत व टिळक चौक  जवळील ओक शाळेत अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली,तसेच लालचौकी येथील अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारक येथेहि जयंती निमित्ताने कार्यक्रम ठेवण्यात आला होता,असंख्य नागरिकांनी अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे पुजा करून दर्शन घेतले,तसेच संध्याकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली,मिरवणूकीत मोठ्या संख्येने मातंग बांधव सहभागी झाले होते, लालचौकी येथे मिरवणीकीची समाप्त करण्यात आली,अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित् माजी आमदार नरेंद्र पवार,नगरसेविका विजया पोटे,नगरसेवक अमित धाक्रस,नगरसेवक जयवंत भोईर,जेष्ठ पत्रकार अरुण सरदेशपांडे,तसेच अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष  विजय कारके,उपाध्यक्ष सुनील इंचाल,रवि गवळी,मोहन गवळी यांच्या सह मातंग समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement