महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित कामगार युनियन स्थापनेवेळी भाजपा कार्यकर्त्यांचा गोंधळ;पोलीसांचा हस्तक्षेप
शिरूर:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित कामगार युनियन स्थापनेवेळी भाजपा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने रांजणगाव एम आय डी सी पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणाखाली आली. रांजणगाव एम आय डी सी तील बेकार्ट कंपनीत कामगार युनियन स्थापनेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.मनसेच्या स्थानिक पदाधिका-यांना याठिकाणी कामगार युनियन स्थापन करण्याचा नैतिक अधिकार नाही अशी भूमिका भाजपा कार्यकर्त्यांनी घेतल्यानंतर मनसे पदाधिका-यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी आरडाओरडा चालू असतानाच एम आय डी सी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटांना शांतता राखण्याचे आवाहन करून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.