• Total Visitor ( 134166 )

शिक्षकांवर स्क्वॉफ मूल्यांकनाचे ओझे

Raju tapal March 01, 2025 13

शिक्षकांवर स्क्वॉफ मूल्यांकनाचे ओझे

१५ मार्चपर्यंतच मुदत, तिहेरी ओझ्याने जिल्ह्यातील शिक्षक त्रस्त

अमरावती :- राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांना शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा २८ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. १२८ मानके असलेल्या या आराखड्याची पूर्तता करण्याकरिता किमान २ महिन्यांचा वेळ लागणार आहे. यामुळे परीक्षा घ्यायची की, हे काम करायचे, असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे.आता १५मार्च पर्यंतच वाढ दिली आहे.पण ती पण कमी पडणार आहे.
राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. या दोन्ही परीक्षा मिळून २७हजार ८९४ पर्यवेक्षक तैनात आहेत. त्याशिवाय परिक्षेच्या इतर नियोजनातही राज्यातील विविध शिक्षकांचा सहभाग आहे. त्याचबरोबर एससीईआरटीने शालेय शिक्षकांसाठी नियोजित केलेले क्षमतावृद्धी प्रशिक्षण सुरू असल्याने अनेक शिक्षक या कामात व्यस्त
आहेत. याचदरम्यान एससीई आरटीने स्थापन केलेल्या राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षातर्फे राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनांच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात शाळांनी स्वयंमूल्यमापन करणे अपेक्षित आहे. त्याकरिता एससीईआरटीने मूल्यमापन पूर्ण करण्याकरिता २८फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली होती. तसेच एससीईआरटीने त्यासाठीचे मार्गदर्शनपर व्हिडिओची मागणी केली आहे. 
याचदरम्यान एससीईआरटीने स्थापन केलेल्या राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षातर्फे राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनांच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात शाळांनी स्वयंमूल्यमापन करणे अपेक्षित आहे. त्याकरिता एससीईआरटीने मूल्यमापन पूर्ण करण्याकरिता २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे. तसेच एससीईआरटीने त्यासाठीचे मार्गदर्शनपर व्हिडिओची मागणी केली आहे. यामुळे शिक्षक हैराण आहेत.

१२८ मुद्यांवरील माहिती

राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेकडून व (एमसीईआरटी) १२८ मुद्यांवरील माहीती शाळांच्या माथी मारण्यात आली. शाळांमध्ये झालेली चर्चासत्रे, इयत्तानिहाय झालेल्या पालक सभा, वार्षिक नियोजन, खेळातून शिक्षण, कथाकथन, अध्ययन अध्य निष्पत्तीवर आधारित उपक्रम, वृक्षारोपणासारखे उपक्रम, ई-लर्निंग साहित्याचा वापर आदींचा यात समावेश आहे.

मुदतवाढ द्या

हे काम प्रचंड वेळखाऊ असल्याने परीक्षांच्या तोंडावर पूर्ण करता येणे शक्य नाही. वार्षिक परीक्षा आल्या की कुठली ना कुठली कारकुनी कामे काढून शिक्षकांच्या माथी मारण्याचा शिरस्ता शालेय शिक्षण विभागाने यंदाही पाळला आहे. सध्या शिक्षकांवर बोर्डाच्या परीक्षा, क्षमतावृद्धी प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांना शिकविणे, असे तिहेरी ओझे आहे. त्यात या मूल्यांकनाची भर पडली आहे. या कामासाठी मुदतवाढ दिली पाहिजे. 

राजेश सावरकर
राज्य प्रसिध्दी प्रमुख
प्राथमिक शिक्षक समिती
 

Share This

titwala-news

Advertisement