वैज्ञानिक शोधांमुळेच मानवी जीवन सुकर ; अरविंददादा ढमढेरे
तळेगाव ढमढेरे महाविद्यालयात 'राष्ट्रीय विज्ञान दिन' साजरा
शिरूर :- मानवासह पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीलाच विज्ञानाने आपल्या कवेत घेतले असून,वैज्ञानिक शोधांमुळेच मानवी जीवन सुकर झाले असल्याचे प्रतिपादन तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव अरविंददादा ढमढेरे यांनी केले.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे, कला व वाणिज्य महाविद्यालयातील विज्ञान विभागामार्फत सर सी.व्ही.रामन यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन - २०२५ साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महाविद्यालयामध्ये विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव अरविंददादा ढमढेरे यांच्या हस्ते करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करताना
अरविंददादा ढमढेरे बोलत होते.
शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, संस्थेचे जेष्ठ संचालक विजयराव ढमढेरे, शिक्षण प्रसारक मंडळ संचालक, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर्जुन मुसमाडे, उपप्राचार्य डॉ.पराग चौधरी, विद्याशाखा प्रमुख प्रा.आकाश मिसाळ, विज्ञान विभाग प्रमुख प्रा.विद्या टुले आदी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय विज्ञान दिन प्रदर्शनामध्ये महाविद्यालयातील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष बी.एस.सी विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने रसायनशास्त्र आधरित आदर्श कार्यशील प्रकल्प, जैवविविधता आणि जैव साखळी पर्यावरण साखळी, विज्ञानाचा दैनंदिन मानवी जीवनावर होणारा परिणाम, वनस्पती उद्यान, हरित गृह, विज्ञानातील आधुनिक शोध आणि संशोधन, विज्ञानातील विविध मानवी जीवन आणि जैवविविधता मानवी शरीरातील विविध अववयांचे व मानवी रक्तगट आणि त्यांचे दैनंदिन जीवनातील महत्व आदी मुद्द्यांशी संबंधित विविध उपक्रमांचे विद्यार्थ्यांनी प्रस्तुत विज्ञान प्रदर्शनामध्ये केलेले सादरीकरण लक्षवेधक ठरले. याशिवाय रांगोळी कलेच्या माध्यमातून तसेच इतर प्रकारचे प्रकल्प व पोस्टर प्रदर्शित करून विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व विद्यार्थी व प्राध्यपकांनी उपस्थितांना सांगितले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महेशबापू ढमढेरे यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. विज्ञानामुळे संपूर्ण जगात उत्क्रांती झाली असून विज्ञानाने लावलेले अनेक शोध मानवी आयुष्यास कलाटणी देणारे ठरले असल्याचे ते म्हणाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर्जुन मुसमाडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचा आत्मविश्वास वाढवला आणि भविष्याच्या वाटचालीत विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी अधिक संशोधन करून आपले वेगळेपण सिद्ध करण्यासाठी व उत्तम दर्जाचे मानवी उपयुक्त प्रकल्प तयार करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अविष्कार स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले .
प्रदर्शनाच्या आयोजनासाठी महाविद्यालयातील डॉ. दत्तात्रय वाबळे, प्रा.आकाश मिसाळ, प्रा.विद्या टुले, प्रा.कांचन भुजबळ प्रा.पुनम शेलार व प्रा.राम कारळे यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयातील डॉ.संदीप सांगळे, डॉ.सोमनाथ पाटील, डॉ.पद्माकर गोरे, डॉ.रवींद्र भगत, डॉ.मनोहर जमदाडे, डॉ.विवेक खाबडे, डॉ.अमेय काळे, प्रा.किशोर आढाव, प्रा.अजिता भूमकर, प्रा.सारिका जेधे आदी या प्रसंगी उपस्थित होते.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे ( शिरूर जि.पुणे )