• Total Visitor ( 700587 )
News photo

चेन स्नॅचिंग प्रकरण; चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

Raju tapal May 05, 2025 137

चेन स्नॅचिंग प्रकरण 

चोरट्याच्या आवळल्या मुसक्या



गोवा येथून घेतले ताब्यात



स्थानिक गुन्हा अन्वेषण आणि पोलिसांनी लावला छडा



सावंतवाडी :- चार दिवसांपूर्वी मळगाव येथे नाईट वॉकसाठी गेलेल्या मुरलीधर गवंडे या वृद्धाची गळ्यातील सोन्याची चैन खेचून दुचाकीवरून पलायन केलेल्या चोरट्याचा अखेर सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण व स्थानिक पोलिसांना छडा लावण्यात यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गोवा-बडोदा ता. फोंडा येथील संशयित आरोपी वासुदेव उर्फ दिपराज दामोदर मुलवी, (वय 38) याला शनिवारी सायंकाळी गोवा येथून ताब्यात घेतले.



त्याने चोरी केल्याचे गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. 27 एप्रिल रोजी सायंकाळी मळगाव येथील राहणारे वृद्ध मुरलीधर गवंडे हे नेहमीप्रमाणे मुंबई - गोवा महामार्गावरील मळगाव तेलकाटवाडी ते महामार्गावरील चॉकलेट फॅक्टरी पर्यंत नाईट वॉकसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या काळ्या रंगाच्या एक्टिवा दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीने गवंडे यांच्या गळ्यातील दहा ग्रॅम वजनाची सुमारे पन्नास हजार रुपये किमतीची सोन्याची चैन खेचून पसार झाला होता. याबाबत मुरलीधर गवंडे यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दुचाकीस्वार चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलीस यंत्रणेने चोरट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. या गुन्ह्याकामी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथकही चोरट्याचा शोध घेत होते. महामार्गावरील बांदा चेक पोस्ट पर्यंत सीसीटीव्ही कॅमेराद्वारे चोरट्याचा पोलिसांनी माग काढला. त्या आधारे व मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग चे पथक व पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस पथकाने गेल्या चार दिवसापासून गोवा येथे तळ ठोकून चोरट्यावर करडी नजर ठेवून होते. अखेर शनिवारी सायंकाळी या गुन्ह्यातील संशयित आरोपी वासुदेव उर्फ दीपराज मुलवी याला येथे जेरबंद केले. त्याला सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याने पोलिसांना गुन्हा केल्याची कबुली दिली. या कारवाईत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, सुधीर सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलीस हवालदार प्रकाश कदम, अनुप खंडे, चंद्रकांत पालकर, जयेश सरमळकर यांनी कारवाई केली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार हनुमंत धोत्रे हे करत आहेत. आरोपीला रविवारी सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपी वासुदेव उर्फ दीपराज मूलवी याने वृद्धाच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचून लंपास केलेला मुद्देमाल हस्तगत करणे, अन्य चोरी त्याचा सहभाग आहे का, तपास करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली. त्यानुसार न्यायालयाने अधिक तपासासाठी आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026