चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपी जेरबंद
Raju Tapal
December 20, 2021
36
जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला कळवा पोलीसांनी अटक करून ३ गुन्हे उघडकीस आणले ।
कळवा पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून जबरी चोरीचे / चैन स्नॅचिंगचे प्रमाण वाढत असल्याने, मा. पोलीस उपायुक्त सो परिमंडळ. १ ठाणे शहर यांनी वाढत्या जबरी चोरीच्या गुन्हयावर अंकुश निर्माण करण्याच्या व आरोपी अटक करून सोन साखळी चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत बाबत सुचना दिल्या होत्या. सदर सुचनाप्रमाणे कळवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उप निरीक्षक महेश कवळे व त्यांच्या पथकास गुप्त बातमीदारा मार्फत माहीती प्राप्त झाली की, चैन स्मॅचिग चोर कावेरी सेतू कळवा परिसरात येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कावेरी सेतु परिसरात योग्य तो सापळा रचुन, आरोपी शकर गजुकुमार प्रताप ऊर्फ कांबळे, वय-२० वर्षे, रा.डॉ.आंबेडकर मैदानाजवळ, मफतलाल झोपडपट्टी, शांतीनगर, कळवा पुर्व ठाणे यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याचा साथीदार नामे हिप्पो ऊर्फ गणेश हा त्याच्याकडे असलेल्या मोटार सायकलवरून पळुन गेला. आरोपीत नामे शंकर राजुकुमार प्रताप ऊर्फ कांबळे, वय-२० वर्षे, यास कळवा पोलीस स्टेशन गुन्हा रजि क । ४१४/ २०२१ भादवि कलम ३९२,३४ प्रमाणे दाखल गुन्हयात दिनांक १२/१२/ २०२१ रोजी अटक करून त्याच्याकडे कौशल्यपुर्ण तपास करून कळवा पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले जबरी चोरी/ चैन स्नॅचिंगचे ३ गुन्हे उघडकीस आणले असुन एकुण १,३८,००० /-रूपये किमतीचे सोन्याचे दागिणे अटक आरोपीताकडून जप्त करण्यात आलेले आहेत.
सदरची कामगिरी ही मा अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे शहर अनिल कुंभारे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, ठाणे शहर अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, कळवा विभाग व्यंकट आंधळे यांचे मार्गदर्शनाखाली कळवा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुदेश आजगांवकर, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, सहा.पो उपनिरी / मंगेश महाजन, पो.हवा. प्रदीप शिंदे, पो हवा. गणेश रामराजे, संदीप महाडीक, सुनिल गुरव व शिवाजी केकाण यांनी केली आहे
Share This