• Total Visitor ( 84964 )

चो-या, घरफोड्या करण्या-या दोघांना अटक

Raju Tapal December 11, 2021 46

चो-या, घरफोड्या करण्या-या दोघांना अहमदनगर तोफखाना पोलीस गुन्हे प्रकटीकरण गुन्हे शाखेकडून अटक

 

अहमदनगर शहरात चो-या, घरफोड्या करणा-या दोघांना आहमदनगर तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली.

गणेश देविदास नल्ला वय - २३ श्रमिकनगर, अहमदनगर, शैलेश दत्तात्रय फाटक वय - २० रा.जिमखाना ग्राऊंडसमोर  एम आय डी सी असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून १ हजार ४०० रूपयांची रोख रक्कम , १ चोरीची दुचाकी, ४ मोबाईल, चांदीचा शिक्का असा एकूण ६९ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सी सी टि व्ही आधारे गुन्ह्यात वापरलेले संशयित वाहन एम आय डी सी परिसरात  असल्याची खबर पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान शेळके, पोलीस अंमलदार शैलेश गोमसाळे, अविनाश वाकचौरे , वसीम पठाण, अहमद इनामदार, धिरज खंडागळे, चेतन मोहिते या पोलीस पथकाने सापळा लावून मल्ला व फाटक या दोघांना अटक केली.

Share This

titwala-news

Advertisement