• Total Visitor ( 659887 )
News photo

माऊलींचे पालखी सोहळ्याची अलंकापुरीत हरिनाम गजरात सांगता

Raju Tapal publisher August 11, 2026 19

माऊलींचे पालखी सोहळ्याची अलंकापुरीत हरिनाम गजरात सांगता



हजेरी मारुती मंदिरात दर्शनास भाविकांची गर्दी 



आळंदी (गौतम पाटोळे):- संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळा हरिनाम गजरात प्रवेशल्या नंतर एकादशी दिनी रविवारी श्रींचे पायी वारी पालखी सोहळ्याची सांगता मानकरी,वारकरी भाविकांचे उपस्थितीत हरिनाम गजरात हजेरी मारुती मंदिरात दिंडी प्रमुख विणेकरी यांचे अभंगरूपी सेवा रुजू करीत हजेरीच्या परंपरेच्या धार्मिक कार्यक्रमांनी प्रथा परंपरांचे पालन करीत उत्साहात झाली. माऊली मंदिरात श्रींचे संजीवन समाधी दर्शनास लाखावर भाविकांनी कामिका आषाढी एकादशी दिनी दर्शनास गर्दी करून दर्शन घेतले. यावेळी परंपरेने कुऱ्हाडे पाटील आणि डॉ. नाईक परिवाराचे वतीने नारळ व प्रसाद वाटते सांगता झाली. आषाढी एकादशी निमित्त श्रींचे मंदिरात तसेच हजेरी मारुती मंदिरात गाभारा आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता. या प्रसंगी श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विष्णू तापकीर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी आळंदी संस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख अँड.राजेंद्र उमाप,प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे,पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, बाळासाहेब आरफळकर,श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे,राजाभाऊ रंधवे चोपदार,पुजारी अमोल गांधी,राजाभाऊ चौधरी,माजी नगराध्यक्ष मानकरी राहूल चिताळकर पाटील,योगीराज कु-हाडे,योगेश आरू,स्वप्नील कुऱ्हाडे,अनिल कुऱ्हाडे,व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,श्रीधर सरनाईक यांचेसह दिंडीकरी,विणेकरी मंदिरात उपस्थित होते. परंपरेच्या उपचारात मंदिरात परंपरेने श्रीना पवमान अभिषेख,दुधारती झाली. श्रीना नैवेद्य झाला. मंदिर व ग्राम प्रदक्षिणेच्या तसेच हजेरी मारुती मंदिरात प्रदक्षिणेत सोहळ्यातील दिंड्यांतील विणेकरी यांचे अभंग झाले. आषाढी एकादशी निमित्त श्रींचे पालखीची मंदिर आणि ग्राम प्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. ख-या अर्थाने सोहळ्याची सांगता हरिनाम गजरात झाली. टाळ मृदंगाचा निनाद,हरी नामाचा जयघोष करीत श्रींचा चांदीचा लक्षवेधी मुखवटा फुलांनी सजलेल्या पालखीत विराजमान करीत श्रींचे पालखीची आषाढी एकादशी दिनी वैभवी मंदिर व नगरप्रदक्षिणा झाली. माऊलींचे पायी वारी पालखी सोहळा कालावधीत मंदिरात नित्य नैमित्तिक धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. ह.भ.प. अवधूत महाराज चक्रांकित परिवार तर्फे हरिपाठावर आधारित कीर्तन सेवा रुजू करण्यात आली. यावेळी उपस्थितांना श्रवण सुखाची ज्ञानभक्तीमय पर्वणी लाभली. आषाढी एकादशी निमित्त आळंदी मंदिरात प्रथा परंपरेचे पालन करीत श्रीची पूजा,आरती, रुद्राभिषेख,पूजा,फराळाचा महानेवेद्य,धार्मिक कार्यक्रम झाले. या साठी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,श्रीधर सरनाईक,संजय रणदिवे,श्रीकांत लवांडे,तुकाराम माने,राजाभाऊ चौधरी,बल्लाळेश्वर वाघमारे यांचेसह सेवकांनी विशेष परिश्रम घेतले. श्रींचे पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर देवस्थान तर्फे वारी सोहळ्यातील मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात आला. या वेळी ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील,व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,उपव्यवस्थापक तुकाराम माने,श्रीधर सरनाईक,श्रीकांत लवांडे,बल्लाळेश्वर वाघमारे,संजय रणदिवे,ज्ञानेश्वर पोंदे आदी मान्यवर उपस्थित होते. हजेरी मारुती मंदिरात श्रीचे पालखी सोहळ्यातील सर्व दिंडीकरी यांची अभंग रुपी सेवा होवून हजेरी घेण्यात आली. या वेळी परंपरांचे पालन करीत  कुऱ्हाडे पाटील व नाईक परिवार  यांचे तर्फे नारळ प्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता झाली. या साठी वसंतराव कुऱ्हाडे,सुरेश कुऱ्हाडे,श्रीधर कुऱ्हाडे आणि कुऱ्हाडे परिवार यांनी तसेच नवशिव शक्ती तरुण मंडळाने परिश्रम घेतले. हजेरी कार्यक्रमा नंतर श्रींची पालखी मंदिरात हरिनाम गजरात आली. मंदिर प्रदक्षिणा, आरती, मानकरी यांस देवस्थान तर्फे नारळ प्रसाद वाटप झाले. या नंतर श्रींची आरती झाली. श्रींचे पालखी सोहळयाचे यशस्वीतेसाठी पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र बाळासाहेब आरफळकर,राजाभाऊ रंधवे चोपदार,बाळासाहेब चोपदार,माऊलींचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे,माजी नगराध्यक्ष राहुल चीतळकर पाटील,योगेश आरु,स्वप्नील कुऱ्हाडे,श्रींचे पुजारी राजाभाऊ चौधरी,अमोल गांधी,साहिल कुऱ्हाडे आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान श्रींचे पालखी सोहळ्याचे काळात शांतता, कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासह,सुरक्षित सुरळीत वाहतूक ठेवण्यास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत वरिष्ठ पोलीस प्रशासनाचे मार्गदर्शनात आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके,वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील,आळंदी पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे आणि पोलीस सेवक,कर्मचारी,अधिकारी यांनी काम पाहिले. 

माऊली मंदिराचे दरवाजे बंद ने भाविकांच्या नाराजी दर्शन नियोजनात अभाव आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातील श्री गणेश दरवाजा,श्री कला मारुती दरवाजा, पान दरवाजा एकादशी दिनी बंद ठेवण्यात आल्याने भाविक, नागरिकांसह व्यापारी नागरिकांत नाराजी व्यक्त झाली. मंदिरात केवळ आजोळघर गांधी वाड्यातील जागेत विकसित दर्शनबारीतून भाविकांना मंदिरात एकाच दरवाजातून प्रवेश देण्यात येत होता. या मुळे रहदारीत मुख्य प्रदक्षिणा मार्गावर रहदारी आणि भाविकांची गर्दी या मुळे वर्दळ अधिक वाढली. दर्शन बारी व्यापारी यांचे थेट दुकाना समोरून पुढे नगरपरिषद चौक आणि पुला वरून पुढे वडगांवकर यांची जुनी वीट भट्टी पर्यंत गेली. यात नियोजनाचा अभाव राहिला. ऊन पाऊसाचे विचार न करता दर्शन बारी मंदिरा बाहेर ठेवण्यात आली. या मुळे भाविकांची तसेच नागरिकांची रहदारीत आणि व्यापारी नागरिकांची व्यवसाय दरम्यान रहदारीला अडथळा निर्माण झाल्याने नाराजीचा वाढ झाली. केवळ आजोळघरातून मंदिरात प्रवेश आणि महाद्वारातून बाहेर जाण्यास दरवाजा खुला ठेवण्यात आला. या मुळे मंदिर परिसरात गर्दी दिसत होती. मात्र मंदिरातील अजानवृक्ष प्रांगणात दर्शनबारी न भरता मोकळी ठेवण्यात आल्याने देखील भाविकांची गरसोय झाली. हि बारी भरली असती तर दर्शनबारी दूरवर गेली नसती. तसेच पूर्णपणे सर्व मजले दर्शनबारी भरली नाही. एक मजला मोकळा ठेवण्यात आल्याने देखील भाविकांना बाहेर पावसात भिजावे लागले. या शिवाय पूर्वी नागापूरकर दर्शनबारी मंडप, गणेश मंदिरासमोरील प्रांगण येथे हि लोखंडी दर्शनबारी लावली जात होती. ती हि दर्शनबारी न लावल्याने भाविकांची रांग दूरवर गेली. आळंदी मंदिरातील व्यवस्थापनाचे नियोजना अभावी नागरिकांनी, भाविकांनी नाराजी व्यक्त केली. मंदिर मोकळे आणि मंदिरा बाहेरील परिसरात गर्दी दाखविण्याचे काम यातून केले गेल्याचे दिसते. वेगवेगळ्या कारणांनी मंदिरातीलचहुं बाजूच्या ओव-या देखील भाविकांना वापरण्यापासून व्यवस्थापनाने वंचित ठेवले. तत्कालीन पालक मंत्री स्व. अजितदादा पवार यांनी आळंदीतील श्रींचा चांदीचा रथ लोकार्पण दिनी तत्कालीन व्यवस्थापनास मंदिराचा मूळ ढांचा न बदलता तसेच सर्व ओव-या या प्राधान्याने भाविकांचे वापरासाठी खुल्या ठेवण्याचे सूचना दिल्या होत्या. याचा देखील व्यवस्थापनास विसर पडला आहे. आजोळघर बाजूकडील दर्शन बारीतून भाविकांना प्रवेश देत श्रींचे दर्शना नंतर थेट महाद्वारातून बाहेर सोडण्यात आले. दरम्यन राज्यातील आलेल्या परंपरेच्या दिंड्यांची हरिनाम गजरात ग्राम प्रदक्षिणा हरिनाम गजरात झाल्या. इंद्रायणी नदी घाटावर आळंदी देवस्थान तर्फे इंद्रायणी आरती इव्हेन्ट उत्साहात झाला. इंद्रायणी आरती सेवा समितीचे वतीने श्रींची आरती,इंद्रायणी आरती,पसायदान,नदी घाटावर केळी प्रसाद वाटप सेवा रुजू करण्यात आली. या वेळी संयोजक अनिताताई झुजम,संयोजक अर्जुन मेदनकर,बाबुराव मोरे, माउली घुंडरे,सरस्वती भागवत,अनिता शिंदे,भाग्यश्री भागवत,उद्योजिका आशा भुतेकर,अनुसया ढराव,सावित्रा घुंडरे,विमल मुसळे,उषा पाटील,नीलम कुरधोंडकर,लता वर्तले,सुवर्णाताई काळे,स्वाती पाचुंदे,तारामती गोरे,द्वारका घुंडरे,शोभा कांबळे,काशीबाई अडकिने,जयश्री भागवत,कौशल्या देवरे,शोभा उबाळे,सुरेख काळभोर,पंचफुला तवर,जयश्री मुसळे,सविता मुंढे,पूजा मुंढे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते. लोढा परिवारातर्फे आषाढी एकादशी दिनी खिचडी प्रसाद वाटप. अन्नदान सर्वश्रेष्ठ दान संकल्पनेतून गेल्या 35 वर्षा पासून सामाजिक कार्यकर्ते उद्योजक अशोक लोढा,मनसुख लोढा,धरमचंद लोढा,दिपेश लोढा परिवारयांचे वतीने एकादशी,महाशिवरात्र,गोकुळाष्टमी, चतुर्थ्या व श्रावण महिन्यातील चारही सोमवार दिनी अन्नदान सेवा उपक्रम राबविण्यात येतो. या एकादशी दिनी भाविकांना प्रसाद म्हणून उपवासाचे पदार्थ उदाहरणार्थ खिचडी,केळी,राजगिरा गुडदाणी शेंगदाणा लाडू, मसाले दूध व महाप्रसाद असा हा अन्नदानाचा उपक्रम लोढा परिवार वर्षभर राबवित असतो. शनिवार रोजी माऊलींच्या पालखीचे आगमन अलंकापुरी नगरीत झाले. यावेळी  प्रथा परंपरेप्रमाणे गेली 35 वर्षांपासून भाविक भक्तांना महाप्रसाद दिला जातो. त्यानुसार हजारो वारकऱ्यांना बेसन,भाकरी,मसालेभात, व शिरा असा शिधा प्रसाद रुपी हजारो भाविकांनाप्रसाद वाटप झाले. तसेच एकादशी दिनी उपवासाचे पदार्थ वाटप सेवा देण्यात आली. आषाढी एकादशी असल्याने माऊली मंदिरातील आजोळ घरी माऊलींचे दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडणाऱ्या  हजारो भाविकांना उपवासाची साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली. या वेळी संपूर्ण लोढा परिवार व  स्वकाम सेवा मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने खिचडीचे वाटप करण्यात आले. माऊलींच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर येथील अवधूत चक्रांकित महाराज तसेच नंदकुमार कुऱ्हाडे,अतुल लोणकर,महेश गोरे,शिवतेज मित्र मंडळ,अलंकापुरी प्रतिष्ठान,तसेच येथील  विविध सामाजिक संस्था यांच्यातर्फे देखील भाविकांना महाप्रसाद वाटप सेवा उत्साहात झाली.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement