• Total Visitor ( 756184 )
News photo

मुरबाडमध्ये सायबर जनजागृती दौडीचे उत्साहात आयोजन...

Raju Tapal publisher October 31, 2026 18

मुरबाडमध्ये सायबर जनजागृती दौडीचे उत्साहात आयोजन...



ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचा पोलिसांचा नागरिकांना संदेश,युवकांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग....



राजू टपाल.



मुरबाड :- डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहारांचा वापर वाढत असताना सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मुरबाड पोलीस स्टेशनच्या वतीने शनिवारी (३१ ऑक्टोबर) सकाळी ७.३० वाजता म्हसा रोड,मुरबाड येथे सायबर जनजागृती दौडीचे उत्साहात आयोजन करण्यात आले.महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या 'सायबर जनजागृती' अभियानांतर्गत आयोजित या दौडीच्या माध्यमातून ऑनलाइन आर्थिक फसवणूक,सोशल मीडिया फसवणूक,बनावट लिंक,ओटीपी फसवणूक तसेच विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे,याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अनोळखी लिंकवर क्लिक करू नका,कोणालाही आपला ओटीपी किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती देऊ नका,ऑनलाइन व्यवहार करताना विशेष खबरदारी घ्या, असे आवाहन करण्यात आले. तसेच सायबर फसवणूक झाल्यास वेळ न घालवता तात्काळ १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले.'डिजिटल एकता,सुरक्षित भविष्य' हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविणे,प्रत्येक नागरिकाला सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून देणे आणि सुरक्षित डिजिटल महाराष्ट्र घडविण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविणे हा या मॅरेथॉनचा मुख्य उद्देश होता.या जनजागृती उपक्रमाला मुरबाड तालुक्यातील नागरिक,युवक,सायबर योद्धे आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती करण्यासाठी मुरबाड पोलिसांनी घेतलेला हा पुढाकार निश्चितच महत्त्वपूर्ण ठरत आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement