• Total Visitor ( 754668 )
News photo

शरद पवारांचा एक फोन अन् दिल्ली पोलिसांची धावपळ...

Raju Tapal publisher October 30, 2026 45

शरद पवारांचा एक फोन अन् दिल्ली पोलिसांची धावपळ...



५२ महिलांच्या बेपत्ता बसचा थरारक किस्सा चर्चेत...



राजकारणात आणि संकटसमयी नेते कसे तातडीने निर्णय घेतात,याचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. पण १९९६ च्या काळातील एक असाच रंजक, थरारक आणि गुप्त ठेवलेला किस्सा सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. हा किस्सा आहे अहिल्यानगर (तब्बल अहमदनगर) मधून दिल्लीला गेलेल्या ५२ महिला कर्मचाऱ्यांचा आणि राजकारणातील ‘भीष्मपितामह’ मानल्या जाणाऱ्या शरद पवारांचा!



नेमकी घटना काय होती?



१९९६ च्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे ५२ अंगणवाडी कर्मचारी आणि महिला एका आंदोलनानिमित्त तसेच महिला दिनानिमित्त दिल्लीत दाखल झाल्या होत्या. आपले सर्व काम आटोपून या सर्व महिला एका बसने दिल्लीहून हरिद्वारच्या दिशेने प्रवासाला निघाल्या. पण,वाटेतच अचानक काही तासांत या बसचा आणि त्यातील महिलांचा संपर्क पूर्णपणे तुटला. रात्रीच्या वेळी दिल्ली किंवा परिसरामध्ये ती बस नेमकी कुठे गायब झाली,याचा थांगपत्ता लागेनासा झाला.



धावपळ आणि पोलिसांची धाव :- महिलांचा पत्ता न लागल्यामुळे त्यांचे नातेवाईक, सहकारी आणि सोबत असलेले पत्रकार प्रचंड घाबरले. काय करावे काहीच सुचत नव्हते. अखेर त्यांनी दिल्लीच्या निजामुद्दीन पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांचीही झोप उडाली.



जेव्हा शरद पवारांनी सूत्रे हातात घेतली :- ही बातमी वाऱ्यासारखी पसरत तत्कालीन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवली गेली. त्यावेळी प्रकरणाची संवेदनशीलता आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पाहता शरद पवारांनी तात्काळ सूत्रे आपल्या हातात घेतली.त्यांनी वेळ न घालवता थेट दिल्लीचे तत्कालीन पोलीस आयुक्त 'नीरज कुमार' यांच्याशी फोनवर संपर्क साधला.



मोठी नाकाबंदी आणि शोधमोहीम :- पवारांच्या एकाच फोननंतर दिल्ली पोलीस यंत्रणा पूर्णपणे खडबडून जागी झाली. दिल्लीतील सर्व पोलीस स्टेशन तातडीने अलर्ट करण्यात आले. दिल्लीच्या सीमांवर, रस्त्यांवर आणि बस स्टँड्सवर कडक नाकाबंदी बसवण्यात आली. संपूर्ण शहरात युद्धपातळीवर राबवलेल्या शोधमोहिमेमुळे काही तासांतच ती ५२ महिलांची बस सुरक्षितपणे शोधून काढण्यात आली. सर्व महिला सुखरूप असल्याचे समोर आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.



बातमी का लपवली गेली?



या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे,महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न,देशभरात निर्माण होणारी अनावश्यक खळबळ आणि अब्रूची शती टाळण्यासाठी शरद पवारांनी ही बातमी मीडियामध्ये मोठी होऊ दिली नाही. वृत्तपत्रांच्या अगदी कोपऱ्यात एका छोट्याशा चौकटीत ही बातमी आली आणि त्यानंतर त्यावर कायमचा पडदा पडला.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement