• Total Visitor ( 754790 )
News photo

कु.वैदही भोसले हिची राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड...

Raju Tapal publisher October 29, 2026 31

कु.वैदही भोसले हिची राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड...

    

शिरूर :- जिल्हा क्रीडा संचालनालय पुणे आयोजित विभागीय तलवारबाजी शालेय स्पर्धा दिनांक २६ व २७ रोजी अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलींच्या गटात तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेची विद्यार्थिनी कु. वैदही अमित भोसले हिने ईपी प्रकारात तृतीय क्रमांक मिळविला. त्यामुळे तिची राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती प्रशालेचे प्राचार्य अशोक दहिफळे यांनी दिली.या स्पर्धा पुढील महिन्यात सोलापूर येथे पार पडणार आहेत. या विद्यार्थिनीला प्रशालेच्या क्रीडाशिक्षक नंदा सातपुते व राजेंद्र भगत यांचे मार्गदर्शन लाभले.प्रशालेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते मानद सचिव अरविंददादा ढमढेरे जेष्ठ संचालक विजयराव ढमढेरे विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे,प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सुनिता पिंगळे,पर्यवेक्षक मोहन ओमासे यांनी यांनी तिचे अभिनंदन केले.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement