दागिन्यांची चोरी करणा-या भावी डॉक्टर गजाआड
पुण्यातील प्रसिद्ध रांका ज्वेलर्स ब्ल्यू स्टोन ज्वेलर्स मधून सोन्याच्या अंगठ्या घेवून पळून जाणा-या दोन भावी डॉक्टरांना हडपसर पोलीसांनी अटक केली.
अनिकेत हनुमंत रोकडे वय - २३, वैभव संजय जगताप वय - २२ अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.
सोन्याच्या अंगठ्या विकत घेण्याच्या बहाण्याने ते सराफाच्या.दुकानात जात असे.अंगठी पाहाण्याचा बहाणा करून अंगठी घेवून पळून जात होते.
पोलीसांनी सराफाच्या दुकानातील सी सी टी व्ही तपासून तांत्रिक विश्लेषण करत दोघा आरोपींना अटक केली. हडपसर येथील रांका ज्वेलर्स मध्ये ८ डिसेंबरला दोन अनोळखी तरूणांनी अंगठ्या विकत घेण्याच्या बहाण्याने चोरी केली होती.
हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होता.