दौंड तालुक्यातील व्यापारी लूट प्रकरणातील चार आरोपींना अटक
दौंड शहरातील किराणा मालाचे घाऊक व्यापारी भक्तू नेवदमल सुखेजा यांच्याकडील १९ लाख ६४ हजार रूपयांच्या लूट प्रकरणात दौंड पोलीसांनी एका अल्पवयीन मुलासह एकूण चार आरोपींना अटक केली आहे.
६ डिसेंबर २०२१ रोजी भक्तू नेवदमल सुखेजा हे ६५ वर्षीय किराणा मालाचे घाऊक व्यापारी दुकानातून पायी घराकडे जात असताना पाच तरूणांनी त्यांच्याजवळील रोकड असलेली पिशवी हिसकावून त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली होती. यासंबंधीचे वृत्त "टिटवाळा" न्यूजने दिनांक ८/१२/२०२१ रोजी प्रसारित केले होते.
याप्रकरणी पोलीसांनी कमल उर्फ कोमल बाबू हिरमटकर वय - २८ रा.देहूरोड सध्या रा. गोवा गल्ली ,प्रदीप उर्फ गणेश महेश कोळी वय - १९ रा.तेलगू कॉलनी ,संभाजीनगर दौंड ,आकाश आरमुगम पिल्ले वय - ३१ रा.देहूरोड जि.पुणे व एका अल्पवयीन मुलासह पोलीसांनी देहुरोड येथून ताब्यात घेतले. टोळीतील एक संशयित आरोपी फरार आहे.
भक्तू सुखेजा यांच्या दुकानाशेजारी रिक्षामध्ये बसून पाळत ठेवून ही लूट केली. देहुरोड येथील आरोपी रेल्वेने आले होते. लूट केल्यानंतर रेल्वे लोकोशेड परिसरातील काटवनात लपून बसले होते. त्यांनी एका खाजगी वाहनाने पुणे गाठले.
आरोपींना अटक करण्याची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधिक्षक राहूल धस , निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने केली.