• Total Visitor ( 84737 )

मोहन्यातील डॉक्टरला जीवे ठार मारण्याची धमकी

Raju tapal November 09, 2024 87

मोहन्यातील डॉक्टरला जीवे ठार मारण्याची धमकी
जागेच्या वादातून धमकी,पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
राजू टपाल.
कल्याण :- मोहने येथे आपला वैद्यकीय व्यवसाय चालविणारे डॉ. अनुदुर्ग बाबुराव ढोणी ( वय ४४) वर्षे यांना जागेच्या वादातून दोन इसमांनी शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला असून याबाबत डॉक्टरांनी त्यांच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि, मोहना गाव आंबिवली येथे राहणारे डॉ.अनुदुर्ग बाबुराव ढोणी हे मोहने बाजारपेठ येथे गणपती नर्सिंग होम या नावाने वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. त्यांनी मौजे मोहने येथील सुरेश शांताराम पाटील व इतर यांच्याकडून ४८/७/६ हि २०० चौरस मीटर हि जागा २८/११/२०१९ रोजी तसेच भूमापन क्रमांक ४८/७/९ अन्वये २०० चौरस मीटर हि लक्ष्मी राजाराम कोट व इतर यांच्याकडून ५/५/२०१७ रोजी व मोहने भूमापन क्रमांक ४८/७/११ च्या २०० मीटर पैकी १०० चौरस मीटर हि देवकुबाई आत्माराम पवार व इतर यांच्याकडून हि दिनांक २१/४/२०१६ रोजी अशी एकूण ५०० चौरस मीटर हि खरेदी केलेली आहे. सदरील जागा हि ऍग्रीकल्चर जमीन असल्याने दिनांक १७/०८/२०२२ रोजी डॉ.अनुदुर्ग धोनी यांनी कल्याण तहसीलदार कार्यालयात अर्ज करून कायदेशीर प्रक्रिया करून १३/६/२०२२ रोजी उपाधीक्षक भूमिअभिलेख यांचे कडून टीएलआर करून घेतला असून जागेच्या खुणा निश्चित केलेल्या आहेत. तसेच सदरील जागेवर बांधकामासाठी लागणारे साहित्य,सिमेंट पोल ठेवलेले असून सदरील जागेवर डॉक्टर धोनी यांचा ताबा आहे.
सदरील जागेवर डॉ. ढोणी हे २७/१०/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता पाहणी करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी तारेचे व सिमेंट पोलचे कंपाउंड केल्याचे तसेचत्या जागेवर जयदीप देविदास पाटील यांनी सदरील मिळकत हि खाजगी मिळकत असून अतिक्रमण ताठ बेकायदेशीर प्रवेश केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा फ्लेक्स बोर्ड लावल्याचे दिसून आल्यावर डॉ.अनुदुर्ग ढोणी यांनी याबाबत जवळच उभे असलेल्या जयदीप पाटील व त्यांचे वडील देविदास पाटील
यांस सदरची जागा हि माझी असून त्यावर तुम्ही कंपाउंड व फ्लेक्स बोर्ड का लावला याची विचारणा केली असता त्या दोघांनी जोरजोरात ओरडत अश्लील शिवीगाव करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली  व सदरील जागेवर पाय ठेवू नकोस म्हणून बजावले. याबाबत डॉ. अनुराग ढोणी यांनी खडकपाडा पोलीस स्टेशन येथे जाऊन जयदीप पाटील व त्याचे वडील देविदास पाटील यांच्या विरोधात रीतसर गुन्हा रजि नंबर ७९९/२०२४ बीएनएस ३२९(३),३५२,३५१(२),३(५) अनव्ये गुन्हा दाखल केला असून याबाबतचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल गुलाब कौतिक आढाव हे करीत आहेत.
याबाबत जयदीप पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की,गेल्या 50 वर्षांपासून आमचा त्या जागेवर कब्जा असून डॉक्टरांना ज्या व्यक्तीने जागा विकली आहे त्या व्यक्तींना डॉक्टरांनी समोर घेऊन यावे व ती जागा त्यांची आहे हे सिद्ध करावे असे सांगितले.
 

Share This

titwala-news

Advertisement