भारतीय चित्रपटसृष्टीतील महान, लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन
भारतीय चित्रपटसृष्टीतील महान,लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांचे मंगळवार दि.११ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. ३१ आॅक्टोबरला मुंबई तील ब्रीच कॅन्डी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी आपल्या दमदार अभिनय,आकर्षक व्यक्तिमत्त्व,प्रेक्षकांच्या अपार प्रेमामुळे ही -मॅन आॅफ बाॅलिवूड अशी ओळख निर्माण केली होती. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधील नसराली गावात झाला होता.त्यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात १९६० साली 'दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून केली. त्यानंतर त्यांनी १९६६ सालच्या "फुल और पत्थर" या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळवली. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर बेस्ट अॅक्टर नामांकन मिळाले होते. सहा दशकाच्या कारकिर्दीत धर्मेंद्र यांनी शोले,चुपके चुपके,सत्यकाम,यादों की बारात,धरमवीर,रजिया सुलतान,दिल्लगी,मेरा गाव मेरा देश,नौकर बीवी का,फुल और पत्थर,घायल यासारखे सुपरहिट चित्रपट दिले. शोले मधील वीरूची भुमिका आजही लोकांच्या मनात कोरलेली आहे. काही चित्रपटांमध्ये त्यांनी निर्मात्याचे काम केले. २०१२ मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.