दुकानदारांकडून खंडणी उकळणा-या दोघा तोतया पुरवठा अधिका-यांना अटक ; महाळूंगे पोलीसांची कामगिरी
खेड तहसिल कार्यालयात पुरवठा अधिकारी असल्याचे सांगत दुकानदारांकडून खंडणी उकळणा-या दोघांना महाळूंगे पोलिसांनी अटक केली..
ज्ञानेश्वर त्रिंबक नेहे वय - ५७ रा.सेक्टर नंबर ४ प्राधिकरण मोशी , संदीप नानासाहेब बोर्डे वय - ३५ रा. हनुमान हौसिंग सोसायटी रूपीनगर पुणे अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.
प्रशांत पायगुडे यांचे महाळूंगे येथे ओम साई गॅस शेगडी रिपेअरिंगचे दुकान असून दोघा आरोपींनी पायगुडे यांच्या दुकानात येवून आम्ही खेड तहसीलदार कार्यालयातील पुरवठा अधिकारी आहोत तुम्ही दुकानात गॅस सिलेंडर कसा काय ठेवता .तुमच्यावर कारवाई करू कारवाई टाळायची असेल तर दहा हजार रूपये हप्ता चालू कर असा दम दिला.
पायगुडे यांना संशय आल्याने त्यांनी यासंदर्भात पोलीसांना माहिती दिली.
पोलीसांनी तात्काळ दुकानात येवून तोतया पुरवठा अधिका-यांची तपासणी केली. त्यांच्याकडे ओळखपत्र किंवा पुरवठा अधिकारी असल्याचा पुरावा सापडला नाही.
म्हाळूंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे दशरथ वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण व पोलीसांनी ही कारवाई केली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण पुढील तपास करत आहेत.