ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्था सक्षम होणे गरजेचे; अरविंददादा ढमढेरे
ख्यातनाम विचारवंत, सत्यशोधक डाॅ.हरी नरके पुरस्कार प्रा.आशुतोष ढमढेरे सर ,प्रा.कावेरी ढमढेरे यांना प्रदान
विजय ढमढेरे
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्था सक्षम होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरविंददादा ढमढेरे यांनी शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे केले.
ख्यातनाम विचारवंत, सामाजिक विषयांचे अभ्यासक डॉ.हरी नरके यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले विचार मंचाच्या वतीने शैक्षणिक कार्यातील विशेष योगदानाबद्दल सत्यशोधक डाॅ.हरी नरके पुरस्कार तळेगाव ढमढेरे येथील प्रा.आशुतोष विलासराव ढमढेरे सर, प्रा.कावेरी आशुतोष ढमढेरे यांना देण्यात आला.
यावेळी आयोजित समारंभात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरविंददादा ढमढेरे बोलत होते.
तळेगाव ढमढेरे गावच्या सरपंच स्वातीताई लांडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या समारंभास शिक्रापूर गावच्या उपसरपंच वंदनाताई भुजबळ, तळेगाव ढमढेरे गावच्या उपसरपंच किर्तीताई गायकवाड, छत्रपती संभाजीनगर येथील व्याख्याते प्रा.संतोष वीरकर, पंचायत समितीचे माजी सदस्य आबासाहेब गव्हाणे,समता परिषदेचे राज्य संघटक सोमनाथ भुजबळ,माळी महासंघाचे प्रवक्ते संजय जकाते, भैरवनाथ ट्रस्टचे संचालक, शिरूर बाजार समितीचे माजी उपसभापती अनिलराव भुजबळ, पाटोदा शहराचे तहसीलदार विजय बनसोडे, सेवानिवृत्त तलाठी कैलासदादा नरके, डाॅ.चंद्रकांत केदारी,पंचायत समितीचे सेवानिवृत्त लेखाधिकारी सुरेंद्र सातपुते,कृष्णाजी ढमढेरे, चेतना ढमढेरे,सामाजिक कार्यकर्ते सुनीलराव ढमढेरे, बापूसाहेब कुदळे,धनंजय नरके,संजय धायरकर,किशोर रासकर,मंगेश नरके,नवनाथ कांबळे, विष्णूपंत नरके,प्रा.विलासराव पाटील, पत्रकार प्रा. नागनाथ शिंगाडे, प्रा.प्रविणकुमार जगताप,प्रा.एन बी मुल्ला, भगवान खुर्पे, पत्रकार विजय ढमढेरे आदींसह राजकीय सामाजिक शैक्षणिक व्यापार क्षेत्रातील प्रमुखांसह विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी पुरस्कार, सन्मान सोहळ्यास उपस्थित होते.
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरविंददादा ढमढेरे पुढे बोलताना म्हणाले, सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची खरी गंगा ग्रामीण भागातील स्त्रियांच्याकरिता दिली असेल तर तर त्यांचे आपल्या समाजावर फार मोठे उपकार आहेत.त्यांनी शाळा चालू करत असताना त्यांना लोकांनी त्रास दिला त्यांनी त्यांचं काम थांबवलं नाही.अशुतोषसरांनी क्लासमधून असंख्य मुलांना ज्ञानदानाचं काम केले म्हणून आशुतोष सरांचा सन्मान, सत्कार करणे उचित आहे.शिक्षणसंस्थेला त्रास देणारे लोक आजही आहेत.शिक्षणसंस्थेला अडचण कशी येईल अशा पद्धतीचे काम आम्ही सगळीकडेच पाहतोय.शिक्षण हे पैशावाल्यांच्या ताब्यात गेलयं.पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी शिकायचं झालं तर पैसे मोजावे लागतात.ग्रामीण भागात तेवढे पैसे लागत नाहीत.
सेवानिवृत्त तलाठी कैलासदादा नरके यावेळी बोलताना म्हणाले, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर यांचा वसा आणि वारसा डाॅ.हरी नरके यांनी जपला. डाॅ.हरी नरके संशोधक, हुशार होते.तळेगावचा आणि नरके परिवाराचा नावलौकिक त्यांनी केला.अशा व्यक्तीचा वारसा जपला जावा म्हणून हा पुरस्कार त्यांच्या नावाने चालू केलेला आहे.आशुतोष सरांच्या क्लासमध्ये शिकलेले विद्यार्थी डाॅक्टर, वकील, इंजिनिअर झाले.चांगलं शिक्षण देण्याचे काम आशुतोष सरांनी केले.समाजामध्येही चांगलं काम ते करतात.
समता परिषदेचे राज्य संघटक सोमनाथ भुजबळ यावेळी बोलताना म्हणाले,डाॅ.हरी नरके सरांनी ग्रामीण,शहरी, जिल्ह्यांमध्ये, राज्यांमध्ये, देशामध्ये,सातासमुद्रापलिकडे, आंतरराष्ट्रीय स्तरावर फुले,शाहू,आंबेडकरांचे पुरोगामी विचार मांडले त्यांच्या विचारांमधून आपल्याला जे प्रबोधन मिळाले ते अनन्यसाधारण आहे.डाॅ. हरी नरके सरांच्या विचारांचा एक जरी धागा पकडला,तो आपण आत्मसात केला तर तुमच्या आमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही.
चेतना ढमढेरे यावेळी बोलताना म्हणाल्या,ज्यांचं शिक्षणक्षेत्रात तळेगावची भावी पिढी घडविण्यामध्ये मोठे योगदान आहे अशा योग्य व्यक्तिला प्रा.आशुतोष ढमढेरे सरांना आज सन्मान मिळाला.ज्या लोकांना महात्मा फुले, सावित्रीबाई फुले समजले तसं मी त्यांना तळेगावचे महात्मा फुले आणि सावित्रीबाई मानते. प्रा.अशुतोष ढमढेरे,प्रा.कावेरी ढमढेरे दोघेही नवरा - बायको खांद्याला खांदा लावून पाचवीपासून डिग्री पर्यंत, कोणत्याही स्पर्धा परिक्षेपर्यंत मुलांना शिकविण्यासाठी खरोखरच मनापासून प्रयत्न करतात.आई वडिलानंतर गुरू हेच आई वडील असतात.वडिलांची भूमिका प्रा.आशुतोष ढमढेरे सर समर्थपणे पार पाडतात.
प्रा.आशुतोष ढमढेरे सर सन्मान,सत्काराला उत्तर देताना म्हणाले,शिक्षणक्षेत्रातील आव्हानाबाबत पालका़ंची मानसिकता वेगळी आहे.आपण जी गोष्ट पाहातो,ऐकतो त्याच्यावर जास्त विश्वास ठेवतो.काळानूसार बदलले पाहिजे. ज्या झाडाला तुम्ही सावली देता ते झाड कधीच वाढणार नाही.
छत्रपती संभाजीनगर येथील प्रा.संतोष वीरकर यांचे यावेळी महात्मा फुले चरित्र,समग्र साहित्यावर व्याख्यान पार पडले.
ख्यातनाम विचारवंत डाॅ.हरी नरके यांच्या कुटूंबातील मंगेश नरके यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
तळेगाव ढमढेरे येथील उपबाजार समिती आवारातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार तसेच छत्रपती शिवाजी महाराज, फुले,शाहू आंबेडकर,डाॅ.हरि नरके यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली होती.