तलाठी असल्याची बतावणी करून जेष्ठ महिलेची फसवणूक
पुणे :- तलाठी असल्याची बतावणी करून जेष्ठ महिलेची फसवणूक करणा-या आरोपीस आळेफाटा पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. ज्ञानदेव हरिभाऊ चेडे वय -४५ रा.चिपाडेमळा ता.नगर सध्या रा.पुनेवाडी ता.पारनेर जि.अहिल्यानगर असे आरोपीचे नाव असून आरोपीकडून १ लाख ८१ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. उल्हासाबाई संतू डोंगरे वय -६८ डोंगरवाडी,काताळवेढे ता.पारनेर जि.अहिल्यानगर असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून याबाबत समजलेल्या माहितीनूसार,ज्ञानदेव चेडे याने उल्हासाबाई यांना सांगितले की,मी तुमच्या गावचा तलाठी आहे. तुमची वाढीव पेन्शन जमा झाली आहे. आपण बॅंकेत जावून ती काढू. मी तुमच्या मुलालाही फोन केला आहे.उल्हासाबाई यांनी आरोपीवर विश्वास ठेवला. पासबूक घेवून त्याने त्यांना बॅंकेच्या बाहेर बसविले. बॅंकेत जावून तुमची पेन्शन घेवून येतो असे सांगितले. तुम्हाला वाढीव पेन्शन काढण्यासाठी पैसे भरावे लागतील. तुम्ही तुमच्या गळ्यातील सोन्याचे दागिने माझ्याकडे द्या. त्यानंतर संबंधित महिलेने सोन्याची माळ चेडे याच्याकडे दिली. मी माझी मोटार घेवून १० मिनिटांत येतो.तुम्ही येथेच थांबा. त्यानंतर तो आलाच नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सतिश टाव्हरे,पोलीस हवालदार विनोद गायकवाड,पंकज पारखे,अमित माळूंजे,नवीन अरगडे,ओंकार खुणे,गणेश जगताप प्रशांत तांगडकर यांनी आरोपीला पकडण्याची कामगिरी केली.