• Total Visitor ( 709615 )
News photo

स्वामी सोशल बार्बर फाउंडेशनतर्फे आदिवासी गावात अन्नधान्य वाटप

Raju Tapal publisher August 16, 2026 78

स्वामी सोशल बार्बर फाउंडेशनतर्फे आदिवासी गावात अन्नधान्य वाटप



राजू टपाल.



टिटवाळा:- स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून स्वामी सोशल बार्बर फाउंडेशनच्या वतीने आदिवासी गाव म्हस्कळ,कोणीवाडा,टिटवाळा येथे गरजू आदिवासी कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत फाउंडेशनने राबविलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. या अन्नधान्य वाटप कार्यक्रमाला स्वामी सोशल बार्बर फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र बिरारी,सचिव पूनम बिरारी तसेच सहकारी संजय बागड आणि ओम बिरारी उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देत सामाजिक कार्याला प्रोत्साहन देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement