डिकसळ ता.इंदापूर येथे सापळा रचून गांजा वाहतूक करणा-या आरोपीला पोलीसांनी अटक करून ३५ किलो वजनाचा अंमली पदार्थ गांजा , एक होंडा शाईन असा एकूण ६ लाख १६ हजार २८० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई केली.
सुनील अनिल जाधव रा.सासवड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून गुरूवार दि.१८/११/२०२१ रोजी दुपारी साडेतीन वाजता डिकसळ येथे ही कारवाई करण्यात आली.
प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक दडस, यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात येवून पोलीस उपनिरीक्षक सुभाष रूपनवर डी.पी.जाधव, पोलीस अंमलदार दत्तू जाधव , रामदास जाधव, सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, हसीन मुलानी महेश बोरूडे, कल्पना वाबळे, होमगार्ड नितीन धुमाळ, पोलीस मित्र विशाल गुरगूळे या पथकाने ही.कारवाई केली.