गोव्यातील मद्यासह ५२ लाखांचा मुद्देमाल पुण्यात जप्त
Raju Tapal
November 07, 2021
42
गोव्यातील मद्यासह ५२ लाखांचा मुद्देमाल पुण्यात जप्त ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
गोवा राज्यात विक्रीसाठी असवेल्या विदेशी मद्य व्हिस्कीचा सुमारे ५२ लाख ४२ हजार रूपये किंमतीचा मोठा मद्यसाठा जप्त करण्याची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यातील वारजे माळवाडी येथे केली.
कृष्णा तुळशीराम कांदे वय ३० रा. आंबिल वडगाव जि.बीड असै याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
केवळ गोवा राज्यासाठी विक्रीकरिता विदेशी मद्याचा साठा असलेला टेम्पो वारजे माळवाडी परिसरात आल्याची माहिती मिळाल्यावरून राज्य उत्पादन शुल्क अधिका-यांनी टेम्पोची झडती घेतली त्यावेळी टेम्पोमध्ये गोवा राज्याकरिता विक्रीसाठी असलेल्या इंपिरियल ब्लू व्हिस्कीच्या सुमारे साडेदहा लाख रूपये किंमतीच्या ६ हजार ९६० सीलबंद बाटल्या आढळून आल्या. मॅकडॉल नंबर 1 च्या १९ लाख ५८ हजार रूपये किंमतीच्या १२ हजार २४० सीलबंद बाटल्या आढळून आल्या. क्लासिक व्हिस्कीच्या २ लाख ४० हजार रूपये किंमतीच्या ६०० सीलबंद बाटल्या जप्त केल्या.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमाप, अंमलबजावणी दक्षता विभागाच्या उषा वर्मा, विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे, पुणे विभागाचे अधिक्षक संतोष झगडे, बीडचे अधिक्षक नितीन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय डेरे, गणेश केंद्रे, योगेंद्र लोळे, दुय्यम निरीक्षक सागर धुर्वे, समीर पडवळ, महेश बनसोडे, राजू पोटे, अभिजित सिसोलेकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
Share This