• Total Visitor ( 501593 )
News photo

टिटवाळ्यात भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन 

Raju tapal January 08, 2026 105

टिटवाळ्यात भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन 

राजू टपाल.

टिटवाळा:- राष्ट्रसंत ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबा व वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ महाराज यांच्या संयुक्त पुण्यतिथी निमित्त तीन दिवशीय भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन शुक्रवार दिनांक 9 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान राष्ट्रसंत भगवानबाबा सेवा मंडळ मांडा टिटवाळा यांच्या वतीने केडीएमसी च्या अग्निशामक केंद्राच्या पाठीमागे करण्यात आले आहे. सदरील कार्यक्रमात 9 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता मंगल कलश पूजन व श्री ची स्थापना,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पूजन व वीणा पूजन करण्यात येणार आहे. पहाटे 5 ते 7 काकडा भजन,सायंकाळी 4 ते 5 प्रवचन सायंकाळी 5 ते 7 हरिपाठ रात्री 8 ते 10 कीर्तन सेवा असे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री 8 ते 10 ह.भ.प. राधाताई सानप (महंत) श्री क्षेत्र मीरबाई संस्थान यांचे कीर्तन होणार आहे. शनिवारी रात्री 8 ते 10 भागवताचार्य ह.भ.प. जगदीश महाराज सोनावणे अध्यक्ष रत्नेश्वर वारकरी शिक्षण संस्था टोकवाडी तर रविवारी सकाळी 9:30 ते 11:30 ह.भ.प. रामायणाचार्य रामकृष्ण महाराज सानप सत्यगाव येवला यांचे काल्याचे कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रसंत भगवानबाबा सेवा मंडळ मांडा यांच्या वतीने करण्यात आले आहे. 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement