शिवशाही महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने मान्यवरांच्या मार्गदर्शनाचे आयोजन
शिरूर (प्रतिनिधी):- शिवशाही महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने तळेगाव ढमढेरे येथील न्युयो सिम कंपनीत शुक्रवार दि.२१ आॅगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता मान्यवरांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी शिरूर पश्चिम मंडल अध्यक्ष,शिवशाही महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष अॅड.सुधीरभाऊ ढमढेरे यांनी ही माहिती "टिटवाळा न्यूज" ला दिली. दौंड तालुक्याचे आमदार राहूल दादा कुल,भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद,भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा प्रभारी संदीप आण्णा भोंडवे,जिल्हा पदवीधर आघाडी अध्यक्ष राहुल दादा गव्हाणे, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहूल दादा गवारे,पंचायत समिती सदस्य राजाभाऊ भुजबळ,उद्योजक सचिन नाना पलांडे हे मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. शिवशाही महाराष्ट्र कामगार संघटनेने कामगारांच्या वेतनवाढीसाठी यशस्वीपणे पाठपुरावा केला आहे तसेच कामगारांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.पुढील मार्गदर्शनासाठी मान्यवरांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे असे अॅड.सुधीरभाऊ ढमढेरे यांनी सांगितले.