• Total Visitor ( 84817 )

गुटख्याची अवैध वाहतूक करणा-या तरूणास अटक

Raju tapal October 10, 2021 41

गुटख्याची अवैध वाहतूक करणा-या तरूणास अटक ; स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग जुन्नर पोलीसांची कारवाई

              --------------

गुटख्याची अवैध वाहतूक करणा-या तरूणास ताब्यात घेवून त्याच्याकडून वाहनासह  ४ लाख ७४ हजार ७८० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग जुन्नर पोलीसांनी केली.

मनोज बाळशीराम वाणी वय २९ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पोलीस हवालदार दीपक साबळे यांनी याबाबतची फिर्याद दिली.

शनिवारी दि.९/१०/२०२१ रोजी पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखा पथक खेड, जुन्नर विभागात गस्त घालत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एकनाथवाडी ता.जुन्नर येथील सिबाका हॉटेल जवळ संशयित इसम गुटखा व पानमसाला बाळगून त्याची वाहतूक करत असल्याचे समजले.

पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नरचे पोलीस निरीक्षक विकास जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस हवालदार दीपक साबळे, विक्रम तापकीर, नाईक संदीप वारे, पोलीस शिपाई अक्षय नवले, निलेश सुपेकर, प्रसाद पिंगळे, शंकर तळपे, गणेश जोरी, या पथकाने छापा टाकला असता मनोज बाळशिराम वाणी वय -२९ रा.पिंपळगाव तर्फे नारायणगाव ता.जुन्नर हा एम एच १४ जे एल ०४२२ या नव्या चारचाकी वाहनात बसलेला आढळून आला. त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा आणि पानमसाला मोठ्या प्रमाणात आढळून आला. पुढील कार्यवाहीसाठी त्याला जुन्नर पोलीसांच्या ताब्यात दिले.

Share This

titwala-news

Advertisement