• Total Visitor ( 479875 )
News photo

खंडाळे गावात आजपासून हरिनाम सप्ताह 

Raju Tapal publisher April 13, 2026 14

खंडाळे गावात आजपासून हरिनाम सप्ताह 



शिक्रापूर:- श्री.रोकडोबा देवाच्या उत्सवानिमित्त शिरूर तालुक्यातील खंडाळे येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे ग्रामस्थांनी आयोजन केले आहे. पहाटे ४ वाजता काकडा भजनाने,अखंड वीणा नामस्मरणाने हरिनाम सप्ताह सोहळ्यास आज सोमवार दि.१३ एप्रिलला सुरूवात करण्यात आली. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन,प्रवचन, हरिपाठ, हरि किर्तन,हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम हरिनाम सप्ताह सोहळ्यात पार पडणार आहेत असे खंडाळे येथील ग्रामस्थांनी सांगितले. ह.भ.प.सृष्टीताई कृष्णा पिंगळे, ह.भ.प.प्रदीपमहाराज खंडागळे,ह.भ.प.संभाजी महाराज दरोडे, ह.भ.प.तुषार महाराज पाबळे, ह.भ.प.संतोष महाराज खेडकर,ह.भ.प.नेहाताई भोसले, रामायणाचार्य ह.भ.प.संतोष महाराज कौठाळे या किर्तनकारांचे कीर्तन,ह.भ.प.चेतनमहाराज धनावडे, ह.भ.प.संदीप महाराज सोनवणे,ह.भ.प.दिलीप महाराज थोरात,ह.भ.प..तेजस महाराज नरवडे,ह.भ.प.शहाजी महाराज जगताप,ह.भ.प.गणेश महाराज डफळ, ह.भ.प.योगेश महाराज कर्पे या प्रवचनकारांचे प्रवचन सप्ताह काळात होणार आहे. पिंपरी दुमाला,पिंपळे धुमाळ,खंडाळे,टाकळी भीमा,देवाची वाडी,शिक्रापूर,पारोडी,दहीवडी, निमगाव म्हाळुंगी,कर्डे‌,आंबळे,वढू बुद्रुक,लंघेवाडी येथील भजनी मंडळाचा हरिजागर सप्ताह काळात पार पडणार आहे. ग्रामस्थांच्या अन्नदानाच्या सहकार्यातून या हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सोमवार दि.२० एप्रिलला ह.भ.प.गणेशमहाराज वाघमारे यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाने हरिनाम सप्ताह सोहळ्याचा समारोप होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement