हायर कंपनीच्या फ्रिजचा अपहार करणा-यास अटक
Raju Tapal
December 13, 2021
34
हायर कंपनीच्या फ्रिजचा अपहार करणा-यास अटक
हायर कंपनीच्या फ्रीजचा अपहार करणा-यास लोणीकंद पोलीस पथकाने अटक केली.
राजू साहेबराव गाडे वय -४१ यशवंतनगर जि.अहमदनगर सध्या रा. लोणीकंद , १२ वा मैल ता.हवेली असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव असून त्याच्याकडून गुन्ह्यातील अपहार केलेले १ लाख २२ हजार ८९२ रूपये किंमतीचे हायर कंपनीचे फ्रिज जप्त करण्यात आले.
९/९ २०२१ रोजी आर पी एम लॉजिस्टीक प्रा.लिमिटेड कंपनी कटकेवाडी येथील गोडावून मधून सोलापूर येथील सुयोग डिजिटल यांचे ऑर्डर मधील १ लाख २२ हजार ८९२ रूपये किंमतीच्या हायर कंपनीच्या फ्रिजचा अपहार करण्यात आला होता.
पोलीस नाईक संदेश शिवले पुढील तपास करत आहेत.
Share This