कल्याण–अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात;कार पलटली,प्रवासी जखमी
आळेफाटा:- कल्याण–अहिल्यानगर महामार्गावर खुबी–करंजाळे परिसरात मंगळवारी मध्यरात्री सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाने रस्त्यालगत असलेल्या खडीच्या ढिगाऱ्याला धडक दिल्यानंतर पिकअप आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेमुळे कार रस्त्यावर पलटली. या अपघातात कारमधील प्रवासी जखमी झाले असून ते संगमनेर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि मदत पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवले. या प्रकरणी पुढील तपास संबंधित पोलीस करत आहेत.