पत्नीचा खून करून फरार झालेल्या आरोपी पतीस अटक
रांजणगाव एम आय डी सी पोलीसांची कामगिरी
शिरूर :- लोखंडी बाजेला बांधून,ऊस तोडणी मजूर पत्नीचा गळा आवळून खून करून फरार झालेल्या आरोपी पतीस रांजणगाव एम आय डी सी पोलीसांनी अटक केली.
माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर आत्माराम गांगुर्डे रा.पिंपरी ता.चाळीसगाव जि.जळगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून ही कामगिरी रांजणगाव पोलीसांनी आरोपीच्या मूळगावी केली.
मिलाबाई ज्ञानेश्वर गांगुर्डे वय -२७ असे खून झालेल्या महिलेचे नाव असून याप्रकरणी ताराचंद सुखलाल गोरे रा.गणेगाव खालसा ता.शिरूर मूळ रा.सिद्धवाडी ता.चाळीसगाव जि.जळगाव यांनी याबाबत फिर्याद दिली होती.
नाशिक येथे नातेवाईकाच्या लग्नाला जाण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून आरोपी माऊली याने त्याची पत्नी मिलाबाई हिचा दोरीने लोखंडी बाजेला बांधून गळा आवळून खून केला होता.
पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन वेगवेगळी पथके तयार करून विविध ठिकाणी तसेच त्याच्या मूळगावी शोध घेतला मात्र तो सापडला नाही.
आरोपी बुधवारी दि.१२ मार्चला त्याच्या मूळगावी येणार असल्याचे समजल्याने पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, संतोष औटी, प्रवीण पिठले, योगेश गुंड या पथकासह गावात वेशांतर करून,सापळा रचून शिताफीने आरोपीला अटक केली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी मुंढे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.