• Total Visitor ( 666247 )
News photo

महिला विकास केंद्रात लहान मुलांसोबत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Raju Tapal publisher August 15, 2026 16

महिला विकास केंद्रात लहान मुलांसोबत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा



उल्हासनगर :- महिला विकास केंद्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालय,साईकृपा कॉलनी,दुर्गादेवी पाडा,जुने अंबरनाथ गाव रोड,उल्हासनगर-५,जिल्हा ठाणे येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या वतीने लहान मुलांसोबत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्षा माननीय हिराताई कांबळे,समुपदेशक स्वप्निल वहाणे,निशा वहाणे,समुपदेशक विनय कांबळे,प्रमुख पाहुणे आदित्य धनवटे यांच्यासह लहान मुले व मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी लहान मुलांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगणारी भाषणे सादर केली. उपस्थित मान्यवरांनी मुलांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व पटवून देत देशाची एकता,स्वातंत्र्य,संविधानिक मूल्ये आणि नागरिकांची जबाबदारी याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखिल वहाणे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मुलांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement