• Total Visitor ( 709597 )
News photo

रायते-पिंपळोलीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Raju Tapal publisher August 15, 2026 38

रायते-पिंपळोलीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा



राजू टपाल.



रायते:- गट ग्रामपंचायत रायते-पिंपळोली कार्यालय तसेच जिल्हा परिषद शाळेत शनिवार,दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण सरपंच सौ. समिता संतोष सुरोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी गावचे उपसरपंच कु.मयुर सुरेश सुरोशी,ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व कर्मचारी,रायते हायस्कूल व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक,पर्यवेक्षक,शिक्षक-शिक्षिका,विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच माजी सरपंच,माजी उपसरपंच,तलाठी,आशा सेविका,अंगणवाडी सेविका व मदतनीस,रोजगार सेवक,पोलीस पाटील,तंटामुक्ती समितीचेअध्यक्ष,शिक्षकवृंद आणि गावातील नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थितांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. यावेळी संपूर्ण परिसरात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. “हर घर तिरंगा,हर मन तिरंगा!” या घोषणेने कार्यक्रमाचा परिसर दुमदुमून गेला.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement