गोवेलीत रात्रीच्या अंधारात सुभेदार फार्म हाऊसवर प्रमिला घोडविंदेची जेसीबीने तोडफोड जीवघेंना हल्ला...!
भयभीत सुभेदार कुटुंबाची पोलीस स्टेशनला धाव
टिटवाळा - कल्याण तालुक्यातील रायते गाव हद्दीमधील गोवेली येथे सुभेदार फार्म हाऊसवर रात्रीच्या अंधारात प्रमिला घोडविंदे यांच्याकडून जेसीबीच्या साहाय्याने तोडफोड आणि कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला या घटनेत फार्म हाऊसचे मोठे नुकसान झाले असून, सुभेदार कुटुंबाची भयभीत होऊन कल्याण तालुका पोलीस स्टेशन टिटवाळा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन तक्रार केली.
फार्म हाऊसची तोडफोड व मोठे नुकसान
महेंद्र सुभेदार यांचे जीवनदीप कॉलेजच्या मागील बाजूस सुभेदार फार्म हाऊस आहे. प्रमिला घोडविंदे आणि हल्लेखोरांनी जेसीबीच्या सहाय्याने फार्म हाऊसचे कंपाउंड आणि कोंबड्यांच्या पत्र्याच्या शेडवर तोडफोड करून आत घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु सुभेदार कुटुंबाने त्रिव्र विरोध केला म्हणून मोठी घटना होता होता वाचली, या घटनेत तब्बल ९४ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, शेडमध्ये असलेल्या ७० ते ८० कोंबड्या पळून गेल्या आहेत. हल्ल्यामुळे सुभेदार कुटुंब भयभीत झाले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जमिनीच्या वादातून हल्ला
महेंद्र सुभेदार यांनी रायते येथील संभाजी सुरोशी यांच्याकडून सर्वे नंबर ६८, हिस्सा नंबर १३ मधील ९४ गुंठे जमीन खरेदी केली होती. ही खरेदी अधिकृतरित्या उपनिबंधक कार्यालयात नोंद झाली असून, गेल्या ३५ वर्षांपासून सुभेदार कुटुंब या जमिनीवर फार्म हाऊस बांधून राहत आहे. मात्र, *प्रमिला विकास घोडबिंदे, उज्ज्वला यशवंत सुरोशी, यशोदा यशवंत सुरोशी आणि जयवंत यशवंत सुरोशी* यांनी या जमिनीवर हक्क सांगत, "या जमिनीमध्ये आमची १० गुंठे जमीन आहे" असा दावा केला. परंतु सुभेदार फार्म हाऊस आणि प्रमिला घोडबंदे यांच्या जागेच्या मध्ये गोवेली ते मानिवली ग्रामपंचायत हद्दीतील जुना रस्ता असून सुभेदार कुटुंबाने स्वतःच्या जागेतील जमीन रस्त्यासाठी सोडून आत मध्ये अनेक वर्षांपूर्वी भिंतीचे बांधकाम केले आहे तरीही नेहमी काही ना काही वाद निर्माण करून प्रमिला गोडबिंदे काही गुंडांना सोबत घेऊन सुभेदार कुटुंबाला नाहक त्रास देतात याचप्रमाणे वाद निर्माण करण्याच्या हेतूने बेकायदेशीरपणे जेसीबी आणून फार्म हाऊसची तोडफोड करण्यात आली यामुळे महिला आणि कामगार अत्यंत घाबरली आहेत. सुभेदार कुटुंबाने तात्काळ कल्याण तालुका पोलीस स्टेशन टिटवाळा वरिष्ठ निरीक्षक सुरेश कदम* यांना भेटून घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी घेतली तत्काळ दखल
घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. महेंद्र सुभेदार यांच्याकडे या तोडफोडीचा संपूर्ण व्हिडिओ पुरावा उपलब्ध* असून, त्याद्वारे आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 333, 324, 352, 351(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभेदार कुटुंबाने मागितला पोलिसांकडून संरक्षण
या हल्ल्यानंतर सुभेदार कुटुंब अतिशय भयभीत झाले आहे. "आम्ही या फार्म हाऊसवर एकटे राहतो. वरील आरोपींकडून आमच्या जीवाला धोका असून, पोलिसांनी आम्हाला न्याय द्यावा तसेच आरोपींवर कठोर कारवाई करावी," अशी मागणी महेंद्र सुभेदार यांनी पोलिसांकडे केली आहे.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले असून, पुढील चौकशीसाठी कल्याण तालुका पोलीस स्टेशन टिटवाळा वरिष्ठ निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी तपास करीत आहेत.