मुढाळे ता.बारामती येथील जिल्हा परिषद शाळेतील कॉम्प्युटर व शालेय पोषण आहाराची भांडी चोरणा-या चोरट्यांना अटक
बारामती तालुक्यातील मुढाळे येथील जिल्हा परिषद शाळेतील कॉम्प्युटर व शालेय पोषण आहाराची भांडी चोरणा-या चोरट्यांना वडगाव निंबाळकर प़ोलीसांनी अटक केली.
राजेंद्र मारूती जाधव वय - २८, लक्ष्मण मल्हारी सकाटे वय - ३१, राहूल वसंत सकाटे वय - २० सर्वजण रा.मुढाळे ता.बारामती अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दोन महिन्यांपूर्वी मंगळवार दि.१४ सप्टेंबर २०२१ रोजी शाळेचे कुलूप तोडून चोरट्यांनी शाळेतील कॉम्प्युटर व शालेय पोषण आहाराची भांडी चोरून नेली होती.
चोरीच्या या घटनेबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्यातील चोरीस गेलेले कॉम्प्युटर स्क्रीन्स, शालेय पोषण आहाराची भांडी जप्त करण्यात आली.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येळे, हवालदार रविराज कोकरे, आसिफ शेख, राजापुरे, पोलीस नाईक अभिजित एकशिंगे, स्पप्निल अहिवळे यांनी ही कारवाई केली.