कबड्डीपटू मुलीच्या खूनप्रकरणी आरोपीस अटक
Raju tapal
October 14, 2021
44
कबड्डीपटू मुलीच्या खूनप्रकरणी आरोपीस अटक ; पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील घटना
-----------------
पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात कबड्डीपटू मुलीच्या खूनप्रकरणी एका आरोपीस पोलीसांनी अटक केली .
ओंकार उर्फ शुभम बाजीराव भागवत वय -२१ रा.चिंचवड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून आरोपी हा मुलीचा नातेवाईक आहे.
खून झालेली मुलगी कबड्डीपटू आहे. ती आठवीत शिक्षण घेत होती. दररोज संध्याकाळी यश लॉन्स परिसरात कबड्डीचा सराव करण्यासाठी जात होती. मंगळवारी दि.१२ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कबड्ढीचा सराव झाल्यानंतर ती मैत्रिणींसोबत गप्पा मारत होती. आरोपी व त्याचे दोन साथीदार तिथे आले .आरोपीने तिला बाजूला बोलावून घेतले. त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. आरोपीने मूलीवर कोयत्याने वार केले. मुलीच्या मैत्रिणींनी मध्ये पडण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपीच्या साथीदारांनी त्यांना धमकावले त्या मुलीला रक्ताच्या थारोळ्यात सोडून आरोपी पळून गेले. घटनास्थळी कोयता, दोन तलवारी, सुरा, मुलीला धमकाविण्यासाठी आणलेले खेळण्यातले पिस्तूल मिळाले.
Share This