• Total Visitor ( 659271 )
News photo

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागांतर्गत सर्व शाळांमध्ये बालचित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न!

raju tapal August 09, 2026 16

कल्याण :- कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाच्या कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये बालचित्रकला स्पर्धा आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.



 विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळावी तसेच चित्रकलेच्या माध्यमातून त्यांच्या कल्पनाशक्तीला अभिव्यक्तीची संधी मिळावी, या उद्देशाने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.



या स्पर्धेमध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ठाणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रांच्या तुलनेत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातून सर्वाधिक विद्यार्थी या बालचित्रकला स्पर्धेत सहभागी झाले, ही शिक्षण विभागासाठी विशेष उल्लेखनीय बाब ठरली.



स्पर्धेपूर्वी विद्यार्थ्यांना स्पर्धेचे नियोजन, नियम व अटी तसेच स्पर्धेबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपली कलात्मकता व कल्पनाशक्ती चित्रांच्या माध्यमातून साकारली. बालचित्रकला स्पर्धा खालील गटांमधून घेण्यात आली



गट क्रमांक 1) पहिली ते दुसरी 



गट क्रमांक 2) तिसरी ते चौथी 



गट क्रमांक 3) पाचवी ते सातवी गट क्रमांक 4) आठवी ते दहावी परीक्षेस 14025 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती.



सदर स्पर्धेचे नियोजन शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच प्रशासन अधिकारी भारत बोरनारे यांनी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले.



शिक्षण विभागातील अधिकारी, समूहसाधन केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व संबंधित कर्मचाऱ्यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनामुळे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये स्पर्धा शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.



विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळून त्यांच्या सर्वांगीण विकासास निश्चितच हातभार लागतो, असा विश्वास शिक्षण विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement