कापुरहोळ ता.भोर येथून पशुधन चोरीस
Raju Tapal
November 10, 2021
37
पुणे - सातारा महामार्गावरील कापूरहोळ ता.भोर येथून म्हैसान जातीच्या दोन म्हशी एक पारडी चोरीस गेल्याची घटना घडली.
सुदाम तानाजी गाडे वय - ५४ रा.कापूरहोळ ता.भोर यांनी याबाबत किकवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादी सुदाम गाडे शेती व दुध व्यवसायातून त्यांचा चरितार्थ चालवत आहेत. त्यांच्याकडे म्हैसान दिल्ली जातीच्या १२ म्हशी आहेत. शनिवार दि.६ नोव्हेंबर ला शेतातील गोठ्यात रात्री जनावरांना चारापाणी करून साडे नऊ वाजता सुदाम गाडे घरी आले. रविवारी दि.७ नोव्हेंबरला पहाटे पावणेसहा वाजता गोठ्यात गेल्यावर.त्यांना काळ्या रंगाच्या दोन म्हशी एक पारडी जागेवर दिसली नाही. गोठ्याची लोखंडी जाळी व दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. म्हशीचा आजुबाजुला तसेच पुणे येथे जनावरांच्या बाजारातही पाहणी केली. तेथेही त्या आढळल्या नाहीत. त्यांची चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी सुदाम गाडे यांनी किकवी ता.भोर पोलीस ठाण्यात धाव घेतली.या म्हशींची बाजारातील किंमत सुमारे ३ लाख रूपये असल्याचे गाडे यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे पुढील तपास करीत आहेत.
Share This